Amol Balwadkar | पावसाळी नाल्यांच्या GIS सर्वेक्षणाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Homeadministrative

Amol Balwadkar | पावसाळी नाल्यांच्या GIS सर्वेक्षणाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Ganesh Kumar Mule Jun 15, 2026 7:47 PM

Mahalunge TP Scheme : प्रत्येक शेतकऱ्याला टीपी स्कीमचा निश्चितपणे फायदा होणार  : पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांचे प्रतिपादन
Amol Balwadkar Vs Chandrakant Patil | जाहीर मेळाव्यातून चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध अमोल बालवडकर यांनी दंड थोपटले | जोरदार शक्तिप्रदर्शन!
Amol Balwadkar on BJP | मुख्य सभेत फेरविचाराचा प्रस्ताव आणून निधी रद्द केल्याचा अमोल बालवडकर यांचा आरोप

Amol Balwadkar | पावसाळी नाल्यांच्या GIS सर्वेक्षणाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

| उद्याच्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – दरवर्षी पावसाळ्यात शहरात होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसमोर GIS बेस्ड सॅटेलाइट सर्वेक्षणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हा प्रस्ताव मांडला असून, उद्याच्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. (GIS BASE Satellite survey)

या प्रस्तावात म्हटले आहे की, दरवर्षी होणाऱ्या पावसामुळे पुणे शहरातील रस्ते, गल्ली, सोसायटी, मैदान याठिकाणी पावसाचे पाणी साचून जनजीवन विस्कळीत होते. अनेक ठिकाणी पावसाळी नाल्यांमुळे अडथळे निर्माण होतात.

ही समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व पावसाळी नाल्यांचा GIS BASE Satellite survey करावा, अशी मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनाला शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांचे नेमके स्वरूप समजून त्यावर वेळेत उपाययोजना करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

प्रस्तावाचे सूचक अमोल रतन बालवडकर असून, अनुमोदक म्हणून नगरसेवक सुहास विजय टिंगरे यांचे नाव आहे. स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केल्यास पावसाळी नाल्यांचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्वेक्षण करून शहरातील पाणी साचण्याचे हॉटस्पॉट ओळखले जाणार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0