Dr Babasaheb Ambedkar Statue | विश्रांतवाडीत साकारणार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा – पुणे महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍तांची पाहणीनंतर जागा निश्‍चितीची सूचना

Homeadministrative

Dr Babasaheb Ambedkar Statue | विश्रांतवाडीत साकारणार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा – पुणे महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍तांची पाहणीनंतर जागा निश्‍चितीची सूचना

Ganesh Kumar Mule Nov 03, 2025 7:54 PM

Dr Siddharth Dhende | प्रभाग क्रमांक दोन मधील लुंबिनी बाल स्नेही उद्यानाची निर्मिती | माजी उपहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा यशस्वी पुढाकार
Buddha Purnima | शिक्षण आणि नैतिकतेचा वापर समाजासाठी हवा : कुलसचिव डॉ. विजय खरे | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार
PMC Polyclinic | नागपूर चाळ, समतानगर येथे पॉलिक्लिनिक सुरू करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे आरोग्य प्रमुखांना निवेदन

Dr Babasaheb Ambedkar Statue | विश्रांतवाडीत साकारणार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा – पुणे महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍तांची पाहणीनंतर जागा निश्‍चितीची सूचना

–  डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकाराने जागा निश्‍चितीसाठी पाहणी

 

Vishrantwadi – (The Karbhari News Service) – विश्रांतवाडी, येरवडा परिसरातील मुकुंदराव आंबेडकर चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. गेली अनेक वर्षे सर्व आंबेडकर प्रेमींचे हे स्वप्न असून, आता ते प्रत्यक्षात उतरणार आहे. भीमक्रांती बुद्ध विहार शेजारील जागा या प्रकल्पासाठी योग्य असल्याचे निश्चित करण्यात आले असून, त्या ठिकाणचा प्रस्ताव तयार करून कायदेशीर व प्रशासकीय मान्यता मिळवण्याच्‍या सूचना पुणे महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त पृथ्वीराज बी. पी. (Prithviraj B P IAS) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्‍या आहेत. यासाठी महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाठपुरावा केला. (Dr Siddharth Dhende)

 

माजी उपमहापौर डॉ. धेंडे यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी अधिकाऱ्यांसह चौकात येऊन जागेची पाहणी केली. यावेळी त्‍यांनी संबंधित विभागाच्‍या अधिकाऱ्यांना सूचना दिल्‍या. या पाहणी वेळी राजेंद्र आल्हाट, विशाल बोर्डे, रोहित कासारे, सुभाष चव्हाण, फैय्याज पाशा, सचिन शिंदे, सोमनाथ खंडाळे, सय्यद जिलानी, सोनल वाईकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महापालिकेचे अधीक्षक अभियंता गव्हाणे, कार्यकारी अभियंता धारव, सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम (येरवडा–कळस–धानोरी कार्यालय), संदीप पाटील आणि वॉर्ड ऑफिसमधील अधिकारी व कर्मचारी या पाहणीला उपस्थित होते.

या चौकात वाहतूक समस्‍या सोडविण्यासाठी महापालिकेच्‍या वतीने उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. हा मुख्य चौक असल्‍याने या चौकातील दर्शनीय भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा असावा, अशी मागणी भीम अनुयायी करत आहेत. चौकाला कालकथित मुकुंदराव आंबेडकर यांचे नाव दिले आहे. हा चौक ऐतिहासिक आहे. या ठिकाणी बाबासाहेब हयात असताना स्‍वतः येऊन गेले आहेत. त्‍यामुळे या ठिकाणी भव्‍य पुतळा उभारावा, अशी इच्‍छा भीम अनुयायी व्‍यक्‍त करत आहेत. या चौकात बाबासाहेबांची जयंती आणि विचारांवर आधारित कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच संतांच्‍या पदस्‍पर्शाने पावन असलेला परिसर आहे. संत ज्ञानेश्‍वर माऊलींची पालखी या मार्गावरून जाते. त्‍यामुळे वाहतूकीस अडथळा न होता पुतळा व्‍हावा, यासाठी डॉ. धेंडे आणि सर्व भीम अनुयायांनी प्रयत्‍न केले.

त्‍यानुसार महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रत्‍यक्ष जागेची पाहणी केली. वाहतूकीस अडथळा होणार नाही, अशी जागा निश्‍चिती करण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत.


बाबासाहेबांचा दर्शनीय भागात पुतळा यासाठी उपमहापौर असताना मी २०१८ मध्ये ठराव केला होता. माझ्यासोबत विहार कमिटीचे सर्व पदाधिकारी देखील पाठपुरावा करत आहेत. महापालिका भवन विभागाचा ठराव केला. विविध विभागाकडून पत्र घेतले. त्‍यासाठी वास्‍तूविशारद, वाहतूक विभाग यांच्‍या सूचनेनुसार पाहणी केली. अतिरिक्‍त्त आयुक्‍तांच्‍या सूचनेनुसार सध्या एक जागा निश्‍चित केली आहे. त्‍यासाठी वाहतूक विभागाचा ना हरकत दाखला मिळविण्यासाठी प्रयत्‍न करणार. जागा निश्‍चिती झाली की कला संचालनालयाची मान्‍यता मिळवून घेऊ. त्‍यानंतर सहा महिन्‍यातच म्‍हणजे एप्रिल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशीच पुतळा अनावरण करण्याचा निर्धार केला आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: