Voter List Mistakes |मतदार यादीमधील चुका दुरुस्त करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

HomeपुणेBreaking News

Voter List Mistakes |मतदार यादीमधील चुका दुरुस्त करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गणेश मुळे May 14, 2024 3:06 PM

Pune Election 2024| निवडणूक पारदर्शक होण्यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Pune Loksabha Election | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू
Dr Suhas Diwase IAS | निवडणूक कामकाजास गैरहजर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Voter List Mistakes |मतदार यादीमधील चुका दुरुस्त करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

Voter List Mistakes – (The Karbhari News Service) – १३ मे २०२४ रोजी पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक (Pune Loksabha Election) प्रक्रिया पार पडली. या मतदानामध्ये बहुसंख्य नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. मतदान यादीमध्ये अनेक चुका झाल्याचे आढळले. अनेक जण मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहिले. आगामी निवडणुकांपूर्वी या मतदार यादीतील चुका (Voter List Mistakes) दुरुस्त करा, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ  धेंडे (Dr Siddharth Dhende Pune) यांनी केली. जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Pune Collector Dr Suhas Diwase) यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी केली.

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, यंदाच्या निवडणुकांमध्ये मतदारांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मतदानामध्ये नाव नसणे. मतदान यादी मध्ये नाव नोंदणी करून देखील यादीत नाव न येणे व पुरवणी यादीत पण नाव नसणे. मतदान यादीतील मतदाराच्या नावापुढे चुकीची नावे असणे. मतदान यादीतील मतदाराच्या नावापुढे चुकीचे पत्ते असणे. मतदार यादीत नावांमधील पत्ता व मतदार केंद्र हे दुसरीकडे दाखवले जाणे. जिवंत व्यक्तीच्या पुढे मृत दाखवले जाणे. मतदार यादीमध्ये स्रीच्या नावापुढे पुरुषाचा फोटो आणि पुरुषांच्या नावापुढे स्त्रीचा फोटो आला होता.

या व अशा असंख्य तांत्रिक बाबींमुळे अनेक नागरिकांना संविधानाने दिलेल्या मूलभूत मतदाराच्या अधिकारापासून वंचित रहावे लागले आहे. आगामी महापालिका व विधानसभा निवडणुकीपूर्वी वरील सर्व बाबींचा विचार करून मोहीम राबवावी. प्रत्येक बूथ वाईस (मतदान केंद्रांप्रमाणे) त्या व्यक्तीने मतदार यादीतील चुका दुरुस्त कराव्यात, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली.