CHS Portal | PMC Health Service | अंशदायी वैद्यकीय योजनेचे संगणकीकरण! |  महापालिका कर्मचाऱ्यांना CHS कार्ड साठी पोर्टलवर माहिती भरण्याचे आदेश

HomeपुणेBreaking News

CHS Portal | PMC Health Service | अंशदायी वैद्यकीय योजनेचे संगणकीकरण! | महापालिका कर्मचाऱ्यांना CHS कार्ड साठी पोर्टलवर माहिती भरण्याचे आदेश

Ganesh Kumar Mule Jun 22, 2023 9:30 AM

Water issue of Warje area | वारजे परिसरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक बैठक   | क्लोजर कमी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन
M J Pradip Chandren IAS | पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी एम जे प्रदीप चंद्रन! | राज्य सरकार कडून आदेश जारी
Ravindra Binwade IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांची बदली!

CHS Portal | PMC Health Service | अंशदायी वैद्यकीय योजनेचे संगणकीकरण! |  महापालिका कर्मचाऱ्यांना CHS कार्ड साठी पोर्टलवर माहिती भरण्याचे आदेश

CHS Portal | PMC Health Service | पुणे महापालिका कर्मचारी (PMC Pune Employees) आणि आजी माजी नगरसेवकांना (Corporators) आरोग्य सुविधा देण्यासाठी पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) अंशदायी वैद्यकीय सहायता योजना (CHS) चालवली जाते. शहरी गरीब वैद्यकीय योजनेप्रमाणे या योजनेचे संगणकीकरण कधी केले जाणार, अशी देखील मागणी केली जात आहे. त्यानुसार महापालिका आरोग्य विभागाने (PMC Health Department) वाटचाल सुरु केली आहे. या योजनेसाठी महापालिका प्रशासनाकडून एक पोर्टल (CHS Portal) तयार करण्यात आले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना CHS कार्ड साठी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती ऑनलाईन भरण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी दिले आहेत. 26 जून पर्यंत ही माहिती देण्याचे आदेशात म्हटले आहे. (CHS Portal | PMC Health Service)

अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या सेवकांसाठी व सेवानिवृत्त सेवकांसाठी आरोग्य कार्यालयामार्फत अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना राबविण्यात येते. या योजनेची ओळखपत्र (CHS कार्ड) सभासदांना देताना सभासदांची माहिती ऑफलाईन (Offline) पद्धतीने रजिस्टर मध्ये नोंदविण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)

या योजनेच्या सभासदांना त्यांचेवर अवलवून असणाऱ्या कुटुंबीयांची माहिती Online पद्धतीने भरण्यासाठी http://chs.punecorporation.org ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामध्ये सभासदांनी त्यांची व त्यांचेवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांची CHS कार्ड वर असणारी माहिती या लिंक वर भरावी. ही माहिती जून पर्यंत http://chs.punecorporation.org या
पोर्टलवर भरावी. असे आदेशात म्हटले आहे. (PMC CHS Portal)
—-
News Title | CHS Portal | PMC Health Service | Computerization of Contributory Medical Scheme! | Mandate to municipal employees to fill information on portal for CHS card