PMC IT Department |  पुणे महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये मराठी टायपिंगसाठी युनिकोड फॉन्टचा वापर अनिवार्य!

Homeadministrative

PMC IT Department |  पुणे महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये मराठी टायपिंगसाठी युनिकोड फॉन्टचा वापर अनिवार्य!

Ganesh Kumar Mule Mar 18, 2026 8:35 PM

Madhuri Misal | मेट्रोचा राडारोडा तातडीने हटवा | अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश | माधुरी मिसाळ
PMC Election Voting | मतदान केंद्र असलेल्या इमारतींमध्ये १४ आणि १५ जानेवारी ला सुट्टी जाहीर!
Policy for property built up | PMC | फक्त आमदार, नगरसेवक सांगतात म्हणून मिळकत (property) नाही बांधता येणार 

PMC IT Department |  पुणे महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये मराठी टायपिंगसाठी युनिकोड फॉन्टचा वापर अनिवार्य!

| माहिती व तंत्रज्ञान प्रमुख यांचे आदेश

 

PMC Unicode Font – (The Karbhari News Service)  – पुणे महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये मराठी टायपिंगसाठी युनिकोड फॉन्टचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान प्रमुख राहुल जगताप (Rahul Jagtap PMC) यांनी या बाबत आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिकेमधील दैनंदिन संगणकीय कामकाजाचे अनुषंगाने संगणकीय पत्रे, कार्यालयीन परिपत्रके व विविध माहितीचे अदान प्रदान इतर महानगरपलिका व शासनाकडील विविध खाती यांमध्ये सुरू असतो. परंतु मराठी भाषेत असलेला मजकूर सर्व ठिकाणी असलेले मराठी टायपिंग सॉफ़्टवेअर आणि फॉन्ट वेगवेगळे असल्यामुळे संगणकावर वाचता येत नाही त्यामुळे सदर माहितीच्या सॉफ़्टकॉपीसोबत टायपिंग केलेला फॉन्टसुद्धा पाठवावा लागतो परंतू अनेक वेळा तांत्रिक सेवक उपलब्ध नसल्यास कामामध्ये अडथळा निर्माण होतो.

 

शासन निर्णयान्वये शासकीय कार्यालयातील मराठी कामकाजामध्ये अधिक सुसुत्रता आणण्याच्या उद्देशाने तसेच कुठल्याही संगणकावर तयार केलेल्या शासकीय कामकाजाच्या नस्ती / धारीका कुठल्याही संगणकावर वाचता याव्यात तसेच त्या भविष्यासाठी व्यवस्थितरित्या जतन करणे सोयीचे व्हावे यासाठी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये युनिकोडचा वापर करणेबाबत  सूचना देण्यात आलेल्या आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेची महत्त्वाची माहिती, जी. आर. (शासन निर्णय), नोटीस, परिपत्रके इत्यादी बाबी डिजिटल स्वरूपात जतन करून ठेवल्या जातात. तसेच, पालिकेच्या सर्वच विभागांमध्ये संगणक प्रणालीवर कामकाज केले जाते व या सर्व प्रकारच्या कामांसाठी युनिकोड फॉन्टचा वापर करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडील ई-निविदा, ई-ऑफिस इ. सर्व संगणकप्रणाली तसेच पालिकेची वेबसाईट, मोबाईल अॅप्स आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्स इ. सर्व संगणकप्रणाली मध्ये युनिकोड चा वापर करण्यात येत आहे.

तथापि, अद्यापही काही विभागांमध्ये युनिकोडचा वापर होत नसल्याचे व याबाबतच्या सूचनांचे काटेकोरपणे अनुपालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून दैनंदिन संगणकीय टायपिंगचे कामकाज युनिकोडचा वापर करून करण्याबाबत कळविण्यात आले आहे. परंतू अद्यापही संगणक टायपिंगमध्ये युनिकोडचा वापर होताना दिसत नाही. टायपिंगच्या कामामध्ये सुसूत्रता तसेच एकसारखेपणा आणण्यासाठी टायपिंगचे सर्व कामकाज करताना युनिकोडचा वापर करणे अनिवार्य आहे. तरी सर्व खातेप्रमुख / विभागप्रमुख यांनी आपल्या कार्यालयाकडील सर्व कर्मचारी यांना टायपिंगचे कामकाज युनिकोडचा वापर करून करण्याचे निर्देश देण्यात यावे. असे राहुल जगताप यांनी म्हटले आहे.


 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: