Pune EV Charging Station | PMC |  पुणे महापालिकेच्या मालकीच्या 20 जागांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्राधान्य!

HomeBreaking Newsपुणे

Pune EV Charging Station | PMC | पुणे महापालिकेच्या मालकीच्या 20 जागांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्राधान्य!

Ganesh Kumar Mule Jun 24, 2023 11:41 AM

PMC Additional Commissioner DPC | पदोन्नती समितीच्या बैठकीत काय निर्णय झाला?
PMC Employees Transfer | गेली 20 वर्ष प्रॉपर्टी टॅक्स विभागात काम करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याची अखेर बदली
PMC Pune Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदासाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी सरकारकडे!

Pune EV Charging Station | PMC |  पुणे महापालिकेच्या मालकीच्या 20 जागांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्राधान्य!

| शहरात 83 जागा निश्चित

Pune EV Charging Station | PMC | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने शहरात 83 ठिकाणी चारचाकी गाड्यांचे चार्जिंग स्टेशन (Four Wheeler Charging Station) उभारण्यात येणार आहेत. हे काम Evigo Charge Pvt. Ltd. या कंपनीला देण्यात आले आहे. 83 स्टेशन पैकी महापालिकेच्या मालकीच्या 20 जागांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्राधान्य राहणार असल्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. तसेच तीनचाकी वाहनांसाठी (Three Wheeler charging Station) देखील स्टेशन उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. (Pune EV Charging Station | PMC)

| बैठकीत हे झाले निर्णय

1. Evigo Charge Pvt. Ltd. यांना निश्चित करून दिलेल्या जागांपैकी ज्याठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यास अडचणी अथवा जागा बदल करणे आवश्यक असेल अशा जागांबाबत विद्युत विभागाने आवश्यक सर्व्हे करून नवीन जागा उपलब्ध करून द्याव्यात. (PMC Pune)

2. Evigo Charge Pvt. Ltd. यांनी निश्चित जागांवर खोदाई करण्यासाठी परवानगीसाठी मनपाच्या विद्युत खात्याकडे अर्ज करावा व पथ विभागाकडे ठरविण्यात आलेले खोदाई शुल्क संबंधितानी भरावे व पुनर्स्थापित (Reinstate) करावे. (Pune Municipal Corporation News)
3. चार्जिंग स्टेशनकरिता अतिरिक्त विद्युत पुरवठा आवश्यक असल्यास Evigo Charge Pvt. Ltd. यांनी MSEB कडे अर्ज करावे व यासाठी आवश्यक मदत विद्युत विभागाने करावी. (PMC Pune News)
4. निविदा जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे Evigo Charge Pvt.Ltd यांना जाहिरातीचे बोर्ड लावण्याची ठिकाणे, त्याचे आकारमान याबाबत आवश्यक पूर्तता करावी. (PMC Electrical Department)
5. प्रथमतः महापालिकेच्या मालकीच्या जागेवर उदा. मनपा मुख्य इमारत, १५ क्षेत्रीय कार्यालय, बालगंधर्व, सावरकर भवन इत्यादी किमान २० ठिकाणी, प्राधान्याने उभारण्यात याव्यात यासाठी विद्युत विभागाने मालमत्ता व मनपाच्या अन्य विभागाशी समन्वयाने जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी. पुणेस्टेशन सारख्या वर्दळीच्या ठिकाणी- जास्तीचे चार्जिंग स्टेशन उभारण्याची कार्यवाही करावी. (PMC Pune Marathi News)
6. महापालिकेमार्फत पे ॲण्ड पार्क योजना राबविण्यात आलेल्या ठिकाणच्या निविदाधारकांना, बसविण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी, चार्जिंगसाठी आलेल्या वाहनाव्यतिरिक्त अन्य वाहन पार्क न करणेबाबत पत्राद्वारे सूचित करावे.
7. रिक्षा व अन्य तीन चाकी वाहनांच्या चार्जिंग स्टेशनबाबत करावयाच्या कार्यवाहीसाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित करावी.
—-
News Title | Pune EV Charging Station |  PMC |  Preference to set up charging station on 20 places owned by Pune Municipal Corporation!