Central Government on PMC | पुणे महापालिकेला केंद्राकडून लवकरच ७१० कोटी रुपयांचा निधी मिळणार

Homeadministrative

Central Government on PMC | पुणे महापालिकेला केंद्राकडून लवकरच ७१० कोटी रुपयांचा निधी मिळणार

Ganesh Kumar Mule May 12, 2026 9:13 PM

Maharashtra Cabinet Meeting | राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा | यासह मंत्रिमंडळ बैठकीतील विविध निर्णय जाणून घ्या 
Iftar Party | सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक | अजित पवार | राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन
PMRDA Calendar | दिनदर्शिकेच्या माध्यमातून पीएमआरडीए पोहोचणार गावागावात

Central Government on PMC | पुणे महापालिकेला केंद्राकडून लवकरच ७१० कोटी रुपयांचा निधी मिळणार!

| स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) –  शहर आणि उपनगरांतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंडातून पुणे महापालिकेला ७१० कोटी रुपयांचा निधी येत्या काही दिवसांत मिळणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Pune PMC News)

दरम्यान, अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेली सुमारे ३५० कोटी रुपयांची कामे यापुढेही सुरू राहणार आहेत. तसेच, आतापर्यंत १ हजार २९० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून येत्या काही दिवसांत आणखी ७१० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात पायाभूत सुविधांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होणार असून त्यातून रस्ते विकासाची कामे हाती घेतली जाणार आहेत.

पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक आणि रस्ते या क्षेत्रांसाठी या निधीतून मदत मिळणार असून राज्य सरकारने सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवले असल्याचेही त्यांनी मंगळवारी (दि.१२) पत्रकारांना सांगितले.

या निधीतून पुणे, नाशिक आणि पिंपरी चिंचवड या शहरांनी आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यापैकी पिंपरी चिंचवड महापालिकेने सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. पुणे महापालिका हद्दीतील वाहणारे पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी या निधीची मागणी करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.

शहरालगतच्या सात गावांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. वाघोली, मांजरी, हंडेवाडी-औताडेवाडी, शेवाळवाडी, बावधन, वडाचीवाडी आणि होळकरवाडी या भागांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (एसटीपी) उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

एकूणच, विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा निधी शहरासाठी उपलब्ध होणार असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले. या निधीच्या मदतीने वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उभारण्यास गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: