Clerical exam | PMC Pune | odd marks | लिपिक परीक्षेत मिळालेल्या विषम गुणांवर महापालिका प्रशासनाने केला खुलासा  | जाणून घ्या सविस्तर 

HomeपुणेBreaking News

Clerical exam | PMC Pune | odd marks | लिपिक परीक्षेत मिळालेल्या विषम गुणांवर महापालिका प्रशासनाने केला खुलासा  | जाणून घ्या सविस्तर 

Ganesh Kumar Mule Nov 13, 2022 5:36 AM

Pune Irrigation Department | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यावरून टीका झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने दिला खुलासा!
PMC Election | पुणे मनपा निवडणुक |  प्रारूप मतदारयादी 23 जूनला होणार,  | मतदार 1 जुलैपर्यंत हरकती मांडू शकतात
Pankaja Munde | आम्ही प्रत्येक निवडणूक चुरशीची समजून लढवत असतो | पंकजा मुंडे

लिपिक परीक्षेत मिळालेल्या विषम गुणांवर महापालिका प्रशासनाने केला खुलासा

| जाणून घ्या सविस्तर

पुणे | महापालिका प्रशासनाकडून लिपिक/ टंकलेखक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. नुकताच त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र यामध्ये काही उमेदवारांना विषम गुण मिळाले आहेत. यामुळे उमेदवारांचा गोंधळ उडाला आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे.
लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना प्रश्न पडला होता कि,  परीक्षा २०० मार्काची होती. (१०० प्रश्न २ मार्क प्रती प्रश्न).कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नव्हते.  त्यामुळे सर्व उमेदवारांना सम संख्येत मार्क पडणे अपेक्षित होते. म्हणजे (उदा;- २,२०,१००,१२०,१८०,१२६) असे.  मात्र विषम संख्येत मार्क पडलेत  (उदा १२१,११७,१६७)विषम मार्क पडूच कसे शकतात. असा प्रश्न उमेदवारांना पडला होता.
यावर आता महापालिका प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले कि, IBPS च्या कार्यपद्धतीनुसार, सत्रांमध्ये वापरल्या जाणार्‍या test batteries (Question Paper) च्या काठीण्य पातळीतील किंचित फरक समायोजित करण्यासाठी, समान-टक्केवारी पद्धतीचा वापर करून विविध सत्रांमधील स्कोअर सामान्यीकृत / समान केले जातात.  याची माहितीही उमेदवारांना जाहिरातीद्वारे देण्यात आली.  अशा प्रकारे, प्रत्येक सत्राच्या  test batteries (Question Paper) च्या काठीण्य पातळीतील थोड्या फरकाने वेगवेगळ्या सत्रांसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या अंतिम गुणांवर परिणाम होऊ शकत नाही.  ही भारतातील चाचणी संस्थांनी अनुसरलेली प्रस्थापित प्रथा आहे.
इथापे यांनी पुढे सांगितले कि, आपली लिपिक पदाची परीक्षा एकूण सहा सत्र मध्ये झाली असल्यामुळे विषम गुण मिळाले आहेत.
अशा पद्धतीने सामान्य केलेले गुण उदा. 80.5 असतील तर दुप्पट करताना 161 असे विषम गुण येऊ शकतात. त्यामुळे दुप्पट करताना सम गुण येतीलच असे नाही. याची माहिती उमेदवाराना जाहिरातीत दिली होती.