Ashok Vidyalaya 12th Results | अशोक विद्यालयाचा ९९.३९ टक्के निकाल; गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम

HomeBreaking News

Ashok Vidyalaya 12th Results | अशोक विद्यालयाचा ९९.३९ टक्के निकाल; गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम

Ganesh Kumar Mule May 02, 2026 7:14 PM

Pune Rain News | पहिल्या पावसात विमानतळ जलमय | युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांची चौकशीची मागणी | दोषींवर कारवाई व आंदोलनाचा इशारा
Maharashtra Youth Congress | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे राज्यस्तरीय विचारप्रधान अभियान व लोकशाही संवाद – शिवराज मोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती; एक मे रोजी होणार उद्घाटन
Ashok Vidyalaya Results | अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.७३ टक्के – सलग बारा वर्षे उज्ज्वल यशाची परंपरा

Ashok Vidyalaya 12th Results | अशोक विद्यालयाचा ९९.३९ टक्के निकाल; गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम

 

12th Results – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन करत ९९.३९ टक्के निकालाची भक्कम नोंद केली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट निकालासाठी ओळख असलेल्या संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासूनची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली. सलग १२ वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा जपत संस्थेने शैक्षणिक क्षेत्रातील आपला वेगळा ठसा अधिक अधोरेखित केला आहे. (Ashok Vidyalaya Pune)

या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य यू. के. भोसले, कनिष्ठ महाविद्यालय विभागाच्या रेखा दराडे, मनीषा मोलावणे तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची अथक मेहनत आणि नियोजनबद्ध अभ्यास यांचा मोलाचा वाटा आहे.

यंदाच्या निकालात विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुणवत्ता सिद्ध केली. विज्ञान शाखेत कौशल पायगुडे (९३.५० टक्के) याने प्रथम क्रमांक पटकावला. समित देवरे (८८.३३ टक्के) द्वितीय, तर कार्तिकी तापकीर (८७.८३ टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेत समृद्धी गायकवाड (८७.१७ टक्के) हिने प्रथम, तर गायत्री बजाज (८६.३३ टक्के) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. कला शाखेत अर्णव मोहोळ (८५.६७ टक्के) याने प्रथम क्रमांक मिळवत संस्थेच्या यशात भर घातली.

संस्थेचे संचालक व खजिनदार प्रथमेश आबनावे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले, “उत्कृष्ट निकाल ही केवळ आकडेवारी नसून शिक्षकांचे समर्पण, विद्यार्थ्यांची जिद्द आणि संस्थेची गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीची बांधिलकी यांचे हे फलित आहे. सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर ते कायम राखण्याची परंपरा अशोक विद्यालयाने यंदाही समर्थपणे जपली आहे.”

संस्थेचे मानद अध्यक्ष मोहन जोशी, सचिव प्रसाद आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, संचालक गौरव आबनावे आणि प्रजोत आबनावे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, प्राचार्य आणि शिक्षकवृंद यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उज्ज्वल निकालाची परंपरा आणि गुणवत्तेचा वारसा जपत अशोक विद्यालयाने शिक्षण क्षेत्रातील आपली विश्वासार्ह ओळख यंदाही अधिक भक्कम केली, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: