PMPML Audit | पीएमपीएमएलच्या मालकीच्या बसेसचा प्रती किमी संचलन खर्च १७५ रु पेक्षा अधिक | लेखापरीक्षणात बाब झाली उघड   | भारतात कुठेही हा खर्च ७५ रु पेक्षा अधिक नाही 

Homeadministrative

PMPML Audit | पीएमपीएमएलच्या मालकीच्या बसेसचा प्रती किमी संचलन खर्च १७५ रु पेक्षा अधिक | लेखापरीक्षणात बाब झाली उघड  | भारतात कुठेही हा खर्च ७५ रु पेक्षा अधिक नाही 

Ganesh Kumar Mule May 02, 2026 3:27 PM

PMC Social Welfare Department | पुणे महानगरपालिका दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम २४ ऑक्टोबर पासून 
Kalagram | वर्षभरात साकारणार कलाग्राम | पु. ल. देशपांडे उद्यानाचा तिसरा टप्पा होणार पूर्ण
GBS WHO Guidelines | आरोग्य विभागाने पाणीपुरवठा विभागावर जबाबदारी ढकलली | मात्र WHO च्या गाइडलाइन्स काय सांगतात? फक्त पाण्यामुळेच होतो का हा आजार? 

PMPML Audit | पीएमपीएमएलच्या मालकीच्या बसेसचा प्रती किमी संचलन खर्च १७५ रु पेक्षा अधिक | लेखापरीक्षणात बाब झाली उघड

| भारतात कुठेही हा खर्च ७५ रु पेक्षा अधिक नाही

 

 Ganesh Mule. 

 

PMP Bus – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी  PMPML चा २०२४-२५ चा लेखापरीक्षण अहवाल स्थायी समिती समोर सादर केला आहे. या अहवालावर फार चर्चा न करता याला मंजुरी देण्यात आली आहे. २०२४-२५ सालात पीएमपी ला ८८५ कोटींची तुट आली आहे. विशेष म्हणजे  पीएमपीएमएलच्या मालकीच्या बसेसचा प्रती किमी संचलन खर्च १७५ रु पेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. भारतात कुठेही हा खर्च ७५ रु पेक्षा अधिक नाही, असे निरीक्षण मुख्य लेखा परीक्षक यांनी नोंदवले आहे. तसेच बऱ्याच सुधारणा देखील सुचवल्या आहेत. त्यानुसार पीएमपी अंमल करून आपला तोटा कमी करणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. (PMC Standing Committee)

 

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या स्वतंत्र परिवहन उपक्रमांचे विलीनीकरण करण्यात आले आहे.  महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत परिवहन उपक्रमातील संचालन तुटी मुळे होणारा खर्च हा स्वतःच्या उत्पन्नातून संबंधित महानगरपालिकांनी भरून काढणे बंधनकारक राहील. तसेच सदर संचलन तूट महानगरपालिकेच्या मुख्य लेखा परीक्षक यांनी लेखापरीक्षण करून प्रमाणित करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यानुसार दोन्ही महापालिका तुटीचा खर्च देतात. मुख्य लेखा परीक्षक यांनी नुकतेच पीएमपी चा २०२४-२५ सालचा लेखापरीक्षण अहवाल स्थायी समिती ला सादर केला होता. त्याला मंजुरी देखील देण्यात आला आहे. दरम्यान मुख्य लेखा परीक्षक यांनी काही गंभीर निरीक्षणे देखील नोंदवली आहेत.

२०२४-२५ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षाचा विचार करताना राज्य परिवहन महामंडळाच्या स्वारगेट डेपोचा प्रति किलोमीटर संचालन  खर्च रु.६२.८१ इतका आहे. बेंगलोर मेट्रो ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) चे भारताचे महानियंत्रक कार्यालयाने केलेल्या कामगिरीचे लेखापरीक्षण (Performance Audit) अहवाल ) नुसार २०२१-२२ करिता सीपीके रू. ७८.२९ इतका असल्याचे दिसून येत आहे. तसेच सन २०२४-२५ मध्ये सीपीके रू. ८३ इतका असलेबाबत मौखिक समजलेले आहे. भारतात सामान्यतः सीपीके साधारणपणे रू. ४५ ते रू. ७५ असतो, अशीही माहिती इंटरनेटवर मिळाली.

पीएमपीएमएलच्या ताफ्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण १९३३ बसेस उपलब्ध होत्या. त्यापैकी स्वमालकीच्या १००१ तर भाडेतत्त्वावरील बसेसची संख्या ९३२ इतकी होती. भाडेतत्त्वावरील बस करिता सरासरी भाडे देय दर प्रती किमी रू. ६८.५०  इतका आहे. भाडेतत्त्वावरील बसेस करिता पुरविण्यात आलेल्या वाहकाचा वेतनाचा खर्चाची
माहिती उपलब्ध होऊ न शकल्याने सदर खर्च अंतर्भूत नाही. सबब अचूक आकडेवारी काढता आली नाही.

तथापि, पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या बसेसचा सीपीके २१९.१९ इतका आहे. यामध्ये भाडेतत्त्वावरील बसेसच्या वाहकाचा वेतन खर्च अंतर्भूत आहे. साधारणतः वाहकाचा वेतनावरील अंदाजित खर्च वगळला तरीही पीएमपीएमएलच्या मालकीच्या बसेसचा सीपीके १७५ पेक्षा अधिकच असण्याची शक्यता आहे.

पीएमपीएमएलचा प्रति किलोमीटर संचालन खर्च रु.१३०.८३ ) इतका म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाच्या तुलनेत जवळपास दुपटीने तर बेंगलोर शहरातील परिवहन उपक्रमाच्या तुलनेत जवळपास ६३% ने जास्त आहे.  तोटा हा समर्थनीय: नाही. उपलब्ध वस्तुस्थितीचा विचार करता पीएमपीएमएलची संचालन तूट वाजवी प्रमाणित करावयाचे झाल्यास सबब कंपनी कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालातील संचालन तूट पूर्णपणे प्रमाणित करणे संयुक्तिक होणार नाही. असे देखील मुख्य लेखापरीक्षक यांनी म्हटले आहे.

मुख्य लेखा परीक्षक यांनी म्हटले आहे कि वस्तुस्थितीचा साधाबाधक विचार करता जास्तीत जास्त रु. ९५/- प्रति किलोमीटर संचलन खर्च विचारात घेणे योग्य आहे. त्यानुसार ही तूट ४६४ कोटी इतकी असायला हवी. मात्र ही तूट ८८५ कोटी इतकी आहे. त्यामुळे पूर्ण तूट देऊ नये, असे म्हटले आहे. लेखापरीक्षक यांनी म्हटले आहे कि, स्व मालकीच्या गाड्या पेक्षा भाडे तत्वावरील बस घेणे योग्य राहील.

| मुख्य लेखा परीक्षक यांनी या सुचवल्या आहेत सुधारणा

पीएमपीच्या कामगिरीत घसरण होताना दिसत आहे. व्यवस्थापनाच्या अकार्यक्षमतेमुळे तोटा वाढत चालला आहे.

नवीन बस खरेदी करताना एको फ्रेंडली असणाऱ्या इलेक्ट्रिक बस खरेदी कराव्यात.

पीएमआरडीए हद्दीत संचलानामुळे येणारी तुट ही PMRDA कडून प्राप्त करून घ्यावी.

इलेक्ट्रिक भाडे तत्वावरील बसेस जास्त किफायतशीर असल्याने भाड्याने बसेस घेताना इलेक्ट्रिक बसेस प्राधान्याने घ्याव्यात.

पीएमपीच्या स्व मालकीच्या खूप बसेस ऑफ रोड आहेत, त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

इलेक्ट्रिक बसेस चे ब्रेक डाऊन खूप कमी असते, मात्र पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसेस च्या ब्रेकडाऊन चे प्रमाण खूप आहे. यावर विश्लेषण होणे आवश्यक आहे.

मुदत संपलेल्या बसेस ची संख्या कमी करून अधिक संख्येने भाडे तत्वावर बसेस घेऊन दुरुस्ती आणि देखभालीवर खर्च कमी करणे गरजेचे आहे.

चालक आणि वाहक या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येचे तर्कसंगत नियोजन किंवा त्यावर कपात करण्याचा विचार करावा.

पीएमपीच्या आकृतीबंधाचा पुनर्विलोकन करण्यात यावे. अनावश्यक पदे व्यपगत करावीत.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: