Annabhau Sathe Sahitya Sammelan | अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे मंगळवारी पुण्यात आयोजन
Pune News – (The Karbhari News Service) – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन येत्या मंगळवारी २३ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमदिरात पार पडणार आहे . या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय वाहतूक दळणवळण राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडणार आहे .यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे . अशी माहिती लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्य आहे अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली आहे .
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था, सांस्कृतिक विभाग, पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .
यावेळी दीपा मुधोळ-मुंडे (IAS)विशेष सहाय्य विभाग) ,मा.ना. माधुरी मिसाळ (राज्यमंत्री, सामाजिक न्याय नगर विकास, परिवहन, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व औकाफ)
मा.डॉ. हर्षदीप कांबळे (IAS) (प्रधान सचिव, सामाजिक न्याय व (आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य)
बीजभाषक: मा.श्री.डॉ. विनय सहस्त्रबुद्धे (माजी सदस्य राज्यसभा)
स्वागताध्यक्ष
मा.श्री. दिलीप कांबळे (माजी राज्यमंत्री)
संमेलनाध्यक्ष
मा.श्री. संपत जाधव (ज्येष्ठ साहित्यिक)
सन्मानीय उपस्थिती :
मा.आ. सुनील कांबळे (सदस्य, महाराष्ट्र विधानसभा)
मा.श्री. प्रा. लक्ष्मण ढोबळे (माजी मंत्री)
मा.आ अमित गोरखे (दस्य, महाराष्ट्र विधान परिषद)
मा.श्री. सुभाष जगताप (माजी सभागृह नेते पुणे मनपा)
मा.श्री. रमेश बागवे
(माजी राज्यमंत्री)
मा.श्री. उत्तमप्रकाश खंदारे (माजी राज्यमंत्री)
मा.श्री. राजू आवळे (माजी आमदार)
मा.श्री. रमेश कदम (माजी आमदार)
या कार्यक्रमाचे स्थळ : मंगळवार, दि. २३-०९-२०२५ रोजी सकाळी ९.०० ते सायं. ७.०० वा. स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रोड, पुणे येथे करण्यात येणार आहे .
014
कार्यक्रमाची रूपरेषा
सकाळी ९.०० ते १०.०० ग्रंथदिंडी
(स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर ते पुणे म.न.पा.चे मुख्य प्रवेशद्वार (पी.एम.सी. मेट्रो स्टेशन) – बालगंधर्व रंगमंदिर
उघडणे : मा. अन्ना धगाटे (ज्ये साहित्यिक)
प्रमुख उपस्थिती : डॉ. जयवंत अवघडे (साहित्यिक) शंकर खवळे (साहित्यिक)
सकाळी ९ ते १०.१५ वा. शाहीरी वंदना सांस्कृतिक कार्यक्रम
सकाळी १०.०० ते १०.१५ अण्णा भाऊ साठे यांच्या छायाचित्रांची प्रदर्शनीचे उद्घाटन
उद्घाटन
: मा.श्री. नवलकिशोर राम (IAS) (पुणे म.न.पा.)
संकल्पना
: डॉ. भरत वैरागे
सत्र क्रमांक १
सकाळी १०.३० ते १२.०० उद्घाटन सत्र
मा.ना.श्री. मुरलीधर मोहोळ (केंद्रीय राज्यमंत्री, सहकार आणि विमान वाहतूक)
मा.ना. माधुरी मिसाळ
(राज्यमंत्री, सामाजिक न्याय नगर विकास, परिवहन, वैद्यकीय शिक्षण
अल्पसंख्याक विकास) मा.श्री. सुनील वारे (व्यवस्थापकीय संचालक, आर्टी)
बीज भाषक :
मा.श्री.डॉ. विनय सहस्त्रबुद्धे (माजी सदस्य राज्यसभा)
उद्घाटन शुभहस्ते :
मा.ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील (मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण)
मा.डॉ. हर्षदीप कांबळे (IAS) (प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)
मा.श्री. नवलकिशोर राम (आयुक्त, पुणे महानगरपालिका)
संमेलनाध्यक्ष :
मा.श्री. संपत जाधव
(ज्येष्ठ साहित्य)
मा.ना.श्री. संजय शिरसाट (मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य)
मा.दीपा मुधोळ-मुंडे (IAS) (आयुक्त सामाज कल्याण महाराष्ट्र राज्य)
मा.श्री. प्रा.डॉ. सुरेश गोसावी (कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
स्वागताध्यक्ष :
मा.श्री. दिलीप कांबळे (माजी राज्यमंत्री)
सत्र क्रमांक २
दुपारी १२.०० ते १.३० परिसंवाद क्र. १ अण्णा भाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्यातील अभिव्यक्ती
अध्यक्ष
: डॉ. उज्ज्वला मोरे (साहित्यिक)
वक्ते : कु. स्नेहल वैजनाथ धुरंदरे, कु. हर्षदा अडागळे, कु. प्रियंका अडागळे, कु. जयश्री बाबर, कु. पुजा कांबळे सौ. सावित्री धुरंदरे, कु. माया रणदिवे
दु. १.३० ते २.३० भोजन समारंभ
सत्र क्रमांक ३
दुपारी २.३० ते ३.३० परिसंवाद क्र. २
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील राष्ट्रीय भूमिका आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णा भाऊंचे योगदान
अध्यक्ष : डॉ. चांगदेव कांबळे
वक्ते : मा.डॉ. मच्छिंद्र सकटे, डॉ. विजय रोडे
तरी या संमेलनाला पुणेकर साहित्य रसिक व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे व निबंधक इंदिरा आस्वार यांच्या वतीने करण्यात आले आहे .

COMMENTS