Ajit Pawar on Pune Metro | अजित पवार यांच्याकडून पुणे मेट्रोच्या भविष्यातील विस्तारित मार्गिकांचा आढावा!
Pune Metro News – (The Karbari News Service) – फुगेवाडी कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थिती पुणे मेट्रोच्या भविष्यातील विस्तारित मार्गिकांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. (Pune News)
या बैठकीत रामवाडी ते वाघोली आणि पिंपरी चिंचवड शहराच्या भागातील विस्तारित पिंपरी चिंचवड मनपा ते निगडी, निगडी ते चाकण या मार्गांची माहिती मा उपमुख्यमंत्री महोदय यांनी घेतली. या मेट्रो मार्गांची आखणी करताना सध्याच्या रहिवासी भागाचा आणि भविष्यात विकसित होण्याची शक्यता असणाऱ्या रहिवासी व व्यावसायिक क्षेत्रांचा अभ्यास करून मेट्रो मार्गांची आखणी करण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत. तसेच भविष्यातील रस्त्यावरील वाहतूकीची समस्या दूर करण्यासाठी शहरातील विविध संस्थांनी समन्वय साधून काम करावे असे आदेश दिले आहेत.
यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी उपमुख्यमंत्री यांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ आणि विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS