Amol Balwadkar | पुणे महापालिका सभागृहात अजित पवार तैलचित्रावरून खडाजंगी : अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला प्रश्न

Homeadministrative

Amol Balwadkar | पुणे महापालिका सभागृहात अजित पवार तैलचित्रावरून खडाजंगी : अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला प्रश्न

Ganesh Kumar Mule Jun 17, 2026 9:40 PM

NCP – Ajit Pawar | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणून अजित दादांच्या राष्ट्रवादीला एकाकी ठेवले जातेय का?
Relief to the citizens of 34 included villages! Important decision of the state government!
PMU Meeting | Ajit Pawar | पुणे मेट्रो मार्गातील अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार – उपमुख्यमंत्री अजित पवार 

Amol Balwadkar | पुणे महापालिका सभागृहात अजित पवार तैलचित्रावरून खडाजंगी : अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला प्रश्न

 

PMC GB Meeting – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावरून सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली.  अजित पवार यांच्या तैलचित्राचा मुद्दा उपस्थित होताच महापौर आणि बालवडकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. (Pune PMC News)

अमोल बालवडकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेत विचारले, “अजितदादा पवार यांचे तैलचित्र पालिकेत कुठेच दिसत नाही. पुणे महापालिका वास्तूत ते का लावले गेले नाही? हे तैलचित्र सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन महापौरांना भेट म्हणून दिले होते.” त्यांनी यावर तातडीने खुलासा करण्याची मागणी केली.

या प्रश्नावर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उत्तर देताना सांगितले, “तैलचित्र लावण्यासाठी राज्य सरकारची परवानगी लागते. ती मिळाल्यावर तैलचित्र लावता येईल. नियमांनुसारच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.”

दरम्यान महापौर आणि अमोल बालवडकर यांच्यात या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक झाली. महापौरांनी  प्रक्रियेचा आणि नियमांचा मुद्दा उपस्थित करत सर्व काही नियमाप्रमाणेच होईल, असे स्पष्ट केले. दरम्यान महापौरांनी आक्षेप घेतला की ज्या विषयावर point of information सुरू आहे, त्याच विषयावर बालवडकर यांनी बोलणे अपेक्षित होते. सभागृहात काही काळ याच मुद्द्यावरून गदारोळ सुरू होता.

हे तैलचित्र सर्व नगरसेवकांच्या वतीने महापौरांना भेट म्हणून देण्यात आले होते. मात्र ते अद्याप महापालिका वास्तूत लावले नसल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राज्य सरकारच्या परवानगीची अट पूर्ण झाल्यानंतरच चित्र लावले जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: