PMC GB on Water Supply |पुणे महापालिका सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) कडून पाणी कपाती वरून आंदोलन!

Homeadministrative

PMC GB on Water Supply |पुणे महापालिका सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) कडून पाणी कपाती वरून आंदोलन!

Ganesh Kumar Mule Jun 17, 2026 9:16 PM

Shivsena Pune | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यातील माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश | शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
Maharashtra Cabinet Meeting Decisions | मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या!
PMC Ward 13 – Pune Station – Jay Jawan Nagar | प्रभाग क्रमांक १३ – पुणे स्टेशन जय जवान नगर | हद्दीच्या बाबतीत सर्वात जास्त चर्चा असलेल्या या प्रभागाची रचना जाणून घ्या सविस्तर 

PMC GB on Water Supply |पुणे महापालिका सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) कडून पाणी कपाती वरून आंदोलन!

| ‘पाणी आमच्या हक्काचे’ घोषणांनी गदारोळ

 

Pune PMC News – (The Karbhari News Service)  – पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या नगरसेवकांनी पाणी कपातीच्या मुद्द्यावरून घागर घेऊन तीव्र आंदोलन केले. सभागृहात घागरी घेऊन आलेल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी “पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे”, “टँकर माफियांना फायदा करून देणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो”, “बेकायदेशीर पाणी कपातीचा धिक्कार असो” अशा घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला. (Pune Water cut News)

शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियोजित आणि बेकायदेशीर पाणी कपात केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.
नगरसेवकांचा दावा आहे की, अधिकृत पाणीपुरवठा कमी करून प्रशासन टँकर माफियांना अप्रत्यक्षपणे फायदा पोहोचवत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना खासगी टँकरमधून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

सभेच्या सुरुवातीलाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नगरसेवक हातात घागरी घेऊन मध्यभागी येऊन घोषणाबाजी करू लागले. “पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. प्रशासनाने हा हक्क नाकारून टँकर माफियांना मोकळे रान दिले आहे,” असा आरोप त्यांनी केला. घागर आंदोलनामुळे काही काळ सभागृहाचे कामकाज ठप्प झाले. विरोधी पक्षाने तातडीने बेकायदेशीर पाणी कपात थांबवावी, सर्व भागांना समान आणि नियमित  पाणीपुरवठा करावा आणि टँकर माफियांवरील कारवाईचा तपशील सभागृहात सादर करावा, अशी मागणी केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: