Sunil Shinde Congress | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांना वैद्यकीय सुरक्षा द्या व ईएसआयसीची मर्यादा वाढवा – नगरसेवक सुनील शिंदे यांची सर्वसाधारण सभेत मागणी

HomeBreaking News

Sunil Shinde Congress | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांना वैद्यकीय सुरक्षा द्या व ईएसआयसीची मर्यादा वाढवा – नगरसेवक सुनील शिंदे यांची सर्वसाधारण सभेत मागणी

Ganesh Kumar Mule Jun 17, 2026 10:05 PM

Cabinet Decision | मंत्रिमंडळ बैठक निर्णय | राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरची पहिली मंत्रिमंडळ बैठक
International Heart Day 2025 | जागतिक हृदय दिनानिमित्त महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी  सीपीआर (CPR) प्रशिक्षण!
GBS In Pune | GBS या साथीच्या रोगाबाबत महानगरपालिके कडून पुणेकरांना देण्यात येणारी मदत न थांबवण्याची मागणी 

Sunil Shinde Congress | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांना वैद्यकीय सुरक्षा द्या व ईएसआयसीची मर्यादा वाढवा – नगरसेवक सुनील शिंदे यांची सर्वसाधारण सभेत मागणी

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत दहा हजारांहून अधिक कंत्राटी कामगार विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. हे कामगार पुणे मनपाच्या कायम सेवकांप्रमाणेच खांद्याला खांदा लावून शहराची सेवा करत आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यातील नियमांमुळे हे सर्व कंत्राटी कामगार सामाजिक सुरक्षेच्या लाभांपासून वंचित राहत आहेत. (PMC General Body Meeting)

या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक व कामगार नेते सुनील शिंदे यांनी महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.

1. वैद्यकीय सुरक्षा: कंत्राटी कामगार वैद्यकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहणार असल्याने, मनपाच्या अंशदायी सहाय्य योजनेचे सभासदत्व त्यांना तातडीने देण्यात यावे.
2. ईएसआयसी मर्यादा वाढ: सध्या ईएसआयसी योजनेची वेतन मर्यादा २१,००० रुपये असल्याने कुशल व अर्धकुशल कामगार या योजनेपासून वंचित राहत आहेत. ही मर्यादा ४०,००० रुपये करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात यावा.

सुनील शिंदे म्हणाले की, “कायम व कंत्राटी असा भेद न करता, समान काम करणाऱ्या सर्व कामगारांना समान सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. मनपाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करावी.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: