Nandini Dhende NCP | ५०० स्क्वेअर फुट पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या सदनिकांना करमाफी द्यावी | नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे यांची मागणी 

HomeBreaking News

Nandini Dhende NCP | ५०० स्क्वेअर फुट पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या सदनिकांना करमाफी द्यावी | नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे यांची मागणी 

Ganesh Kumar Mule Feb 10, 2026 9:08 PM

Savitribai Phule Smarak | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी | अजित पवार
Ajit Pawar on Pune Metro | अजित पवार यांच्याकडून पुणे मेट्रोच्या भविष्यातील विस्तारित मार्गिकांचा आढावा!
Shivneri : Dr Sachin Punekar : शिवजयंतीनिमित्त ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे किल्ले शिवनेरीवर अनावरण

Nandini Dhende NCP | ५०० स्क्वेअर फुट पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या सदनिकांना करमाफी द्यावी | नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे यांची मागणी

 

Pune Property tax – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील ५०० स्क्वेअर फुट पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या सदनिकांना करमाफी द्यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रभाग २ च्या नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे यांनी मुख्य सभेत केली. तसेच संगमघाटावर अजितदादा यांचा  पुर्णाकृती पुतळा व शिल्पसृष्टी उभारण्यात यावी. अशी मागणी देखील धेंडे यांनी मुख्य सभेत केली. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका सदस्य म्हणून धेंडे यांनी महापौर आणि उपमहापौर निवडी वेळी सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेतला. सुरुवातीलाच महापौर पदावर मंजुश्री नागपुरे व उपमहापौर पदावर परशुराम वाडेकर यांच्या निवड प्रक्रियेत सहभाग नोंदवला. कामकाजाच्या पहिल्याच दिवशी आपले मत मांडण्यासाठी संधी धेंडे यांना प्राप्त झाली. धेंडे यांनी  छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती शाहुजी महाराज ,  महात्मा फुले , डाॅ बाबासाहेब आंबेडकर , अण्णा भाऊ साठे, सावित्रीमाई फुले , फातिमा शेख व माता रमाई यांना अभिवादन करुन आपले मत मांडले.

महापौर आणि उपमहापौर यांची निवड झाल्यानंतर अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा घेण्यात आली.

यावेळी धेंडे यांनी आपल्या भाषणात अजित दादांच्या कामकाज पद्धती बाबत वेगवेगळे दाखले देत   पवार यांचे यथोचित स्मारक पुणे मनपाच्या वतीने सुरु असलेल्य नदीसुधार प्रकल्पासाठी संगमवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या प्रशस्त संगमघाटावर अजितदादा यांचा  पुर्णाकृती पुतळा उभारला जावा अशी मागणी केली. तसेच शिल्पसृष्टी उभारण्यात यावी, अशी मागणी देखील केली. धेंडे यांनी आपल्या भाषणात ५००  स्क्वेअर फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ च्या सदनिकाना करमाफी द्यावी अशी मागणी सभागृहात ठेवली.

या करमाफी बाबत महायुती ने देखील आपल्या जाहीरनामा मध्ये याचा उल्लेख केला होता. त्यानुसार माफी दिली तर शहरातील सर्वसामान्य लोकांना याचा खूप फायदा होईल, असे धेंडे यांनी नमूद केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: