Nilesh Nikam NCP Pune | महापालिका सत्तेत सहभागी होण्याची कुठलीही चर्चा नाही | विरोधी बाकावर बसूनच काम करणार |  विरोधी पक्षनेते निलेश निकम

HomeBreaking News

Nilesh Nikam NCP Pune | महापालिका सत्तेत सहभागी होण्याची कुठलीही चर्चा नाही | विरोधी बाकावर बसूनच काम करणार |  विरोधी पक्षनेते निलेश निकम

Ganesh Kumar Mule Jul 14, 2026 7:23 PM

Home Minister Amit Shah | देवेंद्र फडणवीस व अमित शहांनी माफी मागून राजीनामा द्यावा : प्रशांत जगताप
Creative Foundation | उद्यापासून क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या वतीने रंगणार कोथरूड नवरात्र महोत्सव – संदीप खर्डेकर यांची माहिती
Road Repairing | PMC Pune | 50 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणार 193 कोटी! | 50 कोटी वर्गीकरणाने तर 143 कोटी 72 ब नुसार उपलब्ध केले जाणार

Nilesh Nikam NCP Pune | महापालिका सत्तेत सहभागी होण्याची कुठलीही चर्चा नाही | विरोधी बाकावर बसूनच काम करणार |  विरोधी पक्षनेते निलेश निकम

 

Pune Politics – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पुणे मनपाचे विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी पूर्णविराम दिला आहे. माजी खासदार संजय काकडे यांच्या एका वक्तव्यामुळे सुरू झालेल्या चर्चांवर त्यांनी आज अधिकृत खुलासा केला. (Pune PMC News)

निलेश निकम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सत्तेत सहभागी होण्याबत कुठलीही चर्चा झालेली नाही. विरोधी पक्षनेते या नात्याने आम्ही घेतलेल्या भूमिकेशी सुसंगत राहूनच शहरात काम करत आहोत आणि पुढेही करत राहणार.

पुणे शहराच्या हितासाठी आणि नागरिकांनी कर रूपाने दिलेला पैसा योग्य पद्धतीने खर्च व्हावा यासाठी आम्ही काम करत आहोत, असे निकम म्हणाले.

“ज्या ठिकाणी चांगले प्रकल्प असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत. आणि ज्या प्रकल्पांमधून पैशाचा अपव्यय होणार असेल अशा प्रकारच्या प्रकल्पांना आम्ही ठामपणे विरोध करणार आहोत,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

काकडेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
माजी खासदार संजय काकडे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात मनपात सत्तेत जाण्याबत काहीसे सूचक विधान केले होते. त्यानंतर माध्यमांमध्ये या चर्चेला उधाण आले होते. मात्र त्यावर निकम यांनी आज स्पष्टीकरण दिले.

निकम पुढे म्हणाले की, “पुणे शहरामध्ये आमच्या नगरसेवकांमध्ये किंवा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अशा कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. याबत पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे हे वरिष्ठ नेते योग्य वेळी सांगतील.”

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सध्या पुणे मनपात विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. या भूमिकेतूनच शहराच्या विकासासाठी सकारात्मक काम केले जाईल, असेही विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: