HCMTR – Ring Road | HCMTR प्रकल्पासाठी पुणे मनपाकडून विशेष कक्ष स्थापन

Homeadministrative

HCMTR – Ring Road | HCMTR प्रकल्पासाठी पुणे मनपाकडून विशेष कक्ष स्थापन

Ganesh Kumar Mule Jul 14, 2026 1:13 PM

Muralidhar Mohol | विमानतळाच्या मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब; तर पौड फाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल !
Pune BJP Vs Pune Congress | पुण्याच्या वाहतुक कोंडीला काँग्रेसच जबाबदार | भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची टीका
HCMTR Road |MP Murlidhar Mohol |  एचसीएमटीआर रस्ता वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करणार  | केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन 

HCMTR – Ring Road | HCMTR प्रकल्पासाठी पुणे मनपाकडून विशेष कक्ष स्थापन

| भूपृष्ठावरील रस्ता विकास, उन्नत मार्ग आणि युटिलिटी शिफ्टिंगसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका हद्दीतील HCMTR तसेच इनर रिंग रोडच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विशेष कक्ष स्थापन करण्याचा कार्यालीन आदेश जारी केला आहे. (Pune PMC News)

या कक्षामार्फत प्रकल्पाची कार्यवाहीसाठी तांत्रिक, युटिलिटी आणि भूसंपादन अशा ४ वेगवेगळ्या कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे. या कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपला मूळ पदाचा कार्यभार सांभाळून या प्रकल्पाला प्राधान्य देणे बंधनकारक राहणार आहे.

४ कक्षांची जबाबदारी काय?

१. भूपृष्ठावरील रस्ता विकास – At Grade Road Development तांत्रिक कक्ष
शहर अभियंता यांच्या नेतृत्वाखाली हा कक्ष काम करणार आहे. यात कार्यकारी अभियंता श्री. राजेश बनकर, साहाय्यक अभियंता श्री. मुरलीधर वणे यांच्यासह एकूण ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या कक्षाची प्रमुख कामे:
Elevated Corridor खालील बाजूच्या रस्ते विकासाची योजना आणि अंमलबजावणी
Alignment Finalisation, Cross Sections, Service Roads, Junction Improvements चे नियोजन
पदपथ, सायकल ट्रॅक, Drainage, Street Furniture, Landscaping चे नियोजन
Utility Shifting चे नियोजन आणि Traffic Management व Stage Construction चे नियोजन

२. उन्नत मार्ग – Elevated Corridor तांत्रिक कक्ष
मुख्य अभियंता प्रकल्प विभाग यांच्या नेतृत्वाखाली हा कक्ष काम करणार आहे. यात कार्यकारी अभियंता श्री. संदिप पाटील, उप अभियंता श्री. पवन माने यांच्यासह एकूण १२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या कक्षाची प्रमुख कामे:
DPR, Feasibility Report, Detailed Engineering तयार करणे
Horizontal व Vertical Geometry, Alignment, Design Parameters निश्चित करणे
Viaduct, Interchanges, Ramps, Stations इत्यादींचे तांत्रिक नियोजन
Maha Metro, MSIDC, PMPML, रेल्वे, NHAI, PMRDA यांच्याशी समन्वय
विविध तांत्रिक मंजुरी आणि समितींसमोर सादरीकरण

३. सेवावाहिन्या स्थलांतरित करणे कक्ष – Utility Shifting कक्ष
यात उप शहर अभियंता  यांच्यासह पाणीपुरवठा, मनपा-नार, विद्युत विभागातील ५ अधिकारी असतील.

या कक्षाची प्रमुख कामे:
पाणीपुरवठा, मनपा-नार, वीज, गॅस, स्मार्ट सिटी, ट्रॅफिक सिग्नल या सर्व युटिलिटींचे स्थलांतर नियोजन
संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक मंजुरी घेणे
उन्नत मार्ग आणि भूपृष्ठावरील रस्ता विकासासाठी युटिलिटी शिफ्टिंगची वेळेत अंमलबजावणी

४. भूसंपादन कक्ष
उपसंचालक  निखील मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा कक्ष काम करणार आहे. यात कार्यकारी अभियंता जयंत पवार यांच्यासह एकूण ६ अधिकारी असतील.

या कक्षाची प्रमुख कामे:
प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागा संपादन करण्याची कार्यवाही
जागा मालकांशी संपर्क साधून TDR, FSI बाबत माहिती देणे
जमीन मालकांशी समन्वय साधणे

आयुक्तांच्या आदेशानुसार  निखील मिजार, वाहतूक नियोजनकार यांनी शासकीय संस्थांशी समन्वय साधून कक्षाचा साप्ताहिक अहवाल तयार करायचा आहे. तर   समीर गोसावी, उप अभियंता यांनी HCMTR प्रकल्पाच्या Alignment बाबतची संपूर्ण कार्यवाही करायची आहे.

कक्ष SPV च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून DPR तयार करणे, तांत्रिक मंजुरी मिळवणे आणि कामाचा वेग राखण्यासाठी जबाबदार राहील. या कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन मूळ खात्यामार्फतच दिले जाणार आहे.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि मेट्रो प्रकल्पाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी या विशेष कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: