PMC Project Department | धायरी पुलावरील तडे – मनपा प्रकल्प विभागाची पाहणी – “पुलाची संरचना सुरक्षित, फक्त डांबरीकरणात तडे”

Homeadministrative

PMC Project Department | धायरी पुलावरील तडे – मनपा प्रकल्प विभागाची पाहणी – “पुलाची संरचना सुरक्षित, फक्त डांबरीकरणात तडे”

Ganesh Kumar Mule Jul 08, 2026 8:37 AM

Pune Rajaram Bridge | राजाराम पुलाची दुरुस्ती सुरू | वाहतुक कधी राहणार बंद! जाणून घ्या
Sadhu Vaswani Flyover | PMC Pune | साधू वासवानी उड्डाणपूल 6 जानेवारी पासून वाहतुकीसाठी राहणार बंद!
PMC Pay and Parking Policy | पे अँड पार्क ची निविदा प्रक्रिया लागू | ८ दिवसांचा कालावधी | प्रायोगिक तत्त्वावर ५ रस्त्यांची निवड 

PMC Project Department | धायरी पुलावरील तडे – मनपा प्रकल्प विभागाची पाहणी – “पुलाची संरचना सुरक्षित, फक्त डांबरीकरणात तडे”

पाऊस थांबताच तात्काळ दुरुस्ती करणार – मुख्य अभियंता (प्रकल्प)  कार्यालय

 

Dhayari Bridge – (The Karbhari News Service)–  सोशल मीडियावर धायरी पुलाच्या संरचनेला तडे गेल्याचा आणि पूल खचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेने तातडीने पाहणी केली. पाहणीनंतर पुलाची संरचना पूर्णपणे सुरक्षित असून, वाहतुकीसाठी कोणताही धोका नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही माहिती पुणे महानगरपालिका मुख्य अभियंता (प्रकल्प) कार्यालयाने दिली आहे. (Pune PMC News)

प्रशासनाची पाहणी काय सांगते?
व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर तातडीने पुल विभागाचे अभियंते, सल्लागार आणि कंत्राटदार यांनी संयुक्तपणे धायरी पुलाची पाहणी केली.

पाहणीदरम्यान असे निदर्शनास आले की, धायरी पुलावरील रस्त्याच्या Expansion Joint च्या ठिकाणी रस्त्याला तडे निर्माण झाले आहेत.

तडे का पडले?
मनपाच्या म्हणण्यानुसार, सदर ठिकाणी खाली कालवा असल्यामुळे *Expansion Joint* ची रचना आवश्यक तांत्रिक बाबी लक्षात घेऊन विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे.

तपासणीअंती हे स्पष्ट झाले की, हे तडे हे फक्त रस्त्याच्या डांबरीकरणाच्या थरामध्येच आहेत. पुलाच्या मुख्य संरचनेमध्ये कोणतीही हानी, खचणे `Settlement` किंवा संरचनात्मक बिघाड आढळून आलेला नाही.

पूल सुरक्षित आहे का?
मनपाने स्पष्ट केले आहे की, पुलाची संरचनात्मक सुरक्षितता पूर्णपणे अबाधित आहे. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.

दुरुस्ती कधी होणार?
सदर रस्त्याच्या डांबरीकरणातील तड्यांची दुरुस्ती पाऊस थांबल्यावर तात्काळ हाती घेण्यात येणार असल्याचे मुख्य अभियंता (प्रकल्प )कार्यालयाने सांगितले आहे.

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे तात्पुरती दुरुस्ती करणे शक्य नसल्याने पावसाचा जोर कमी झाल्यानंतर युद्धपातळीवर काम केले जाणार आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: