Mayor Manjusha Nagpure | खडकवासला धरणाच्या पाण्याच्या विसर्गानंतर महापौर मंजुषा  नागपुरे यांची एकता नगर व विठ्ठल नगर तसेच शिवाजी नगर परिसराला पहाटे भेट

Homeadministrative

Mayor Manjusha Nagpure | खडकवासला धरणाच्या पाण्याच्या विसर्गानंतर महापौर मंजुषा  नागपुरे यांची एकता नगर व विठ्ठल नगर तसेच शिवाजी नगर परिसराला पहाटे भेट

Ganesh Kumar Mule Jul 08, 2026 7:40 AM

PMC Merged Villages Property tax | समाविष्ट गावांतील कर आकारणीची समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची समिती गठीत केली जाणार! 
Pune Water Supply | पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत | सध्या कोणतीही पाणीकपात नाही – महापौर मंजुषा नागपुरे
Floating Spider Machine | तलाव आणि नदी स्वच्छतेसाठी अत्याधुनिक “फ्लोटिंग स्पायडर मशीन”चे जांभूळवाडी येथे प्रात्यक्षिक

Mayor Manjusha Nagpure | खडकवासला धरणाच्या पाण्याच्या विसर्गानंतर महापौर मंजुषा  नागपुरे यांची एकता नगर व विठ्ठल नगर तसेच शिवाजी नगर परिसराला पहाटे भेट

| नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

 

Pune Rain – (The Karbhari News Service) –  खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या  महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज पहाटे सिंहगड रस्त्यावरील एकता नगर व विठ्ठल नगर या संभाव्य बाधित परिसरांची प्रत्यक्ष पाहणी केली. (Pune Rain News)

यावेळी महापौरांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

या प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनामार्फत आवश्यक सूचना देण्यात आल्या. नदीपात्रालगत तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि आवश्यकता भासल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर मंजुषा ताई नागपुरे यांनी केले.

महापौर म्हणाल्या, “पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका पूर्णपणे सज्ज असून आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाईल.”

पाहणीदरम्यान स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्यांच्या सूचनांची दखल घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: