Shrinath Bhimale on PPP Model Road | पीपीपी मॉडेल वरील रस्त्यांची फक्त 20% कामे झाली | स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला फटकारले

Homeadministrative

Shrinath Bhimale on PPP Model Road | पीपीपी मॉडेल वरील रस्त्यांची फक्त 20% कामे झाली | स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला फटकारले

Ganesh Kumar Mule Apr 17, 2026 7:30 AM

PMC Budget 2025 -26 | पुणे महापालिका आयुक्त ४ मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक! – खास सभा घेण्यास स्थायी समितीची मान्यता
PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने जानेवारी महिन्यात वसूल केला ६० लाखाचा दंड!
PMC Standing Committee | अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून खड्ड्यांची पाहणी करावी | श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश

Shrinath Bhimale on PPP Model Road | पीपीपी मॉडेल वरील रस्त्यांची फक्त 20% कामे झाली | स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला फटकारले

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्ते तसेच पुल पीपीपी तत्वावर खाजगी सहभागातुन डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यामध्ये विकसित करण्याचा निर्णय  घेतलेला आहे. त्यानुसार शहरात कामे सुरु आहेत. मात्र यात दिरंगाई होत असल्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी कालच्या समितीच्या बैठकीत प्रशासनाला फटकारले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून कामे सुरु असताना देखील फक्त २० टक्के रस्त्यांची कामे झाली आहेत. त्यामुळे या रस्त्यांची मी पाहणी करणार आहे, असे अध्यक्ष भिमाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  (Pune PMC News)

पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्ते तसेच पुल पीपीपी तत्वावर खाजगी सहभागातुन डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यामध्ये विकसित करण्यात येत आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप धर्तीवर डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यात रस्ते किंवा डीपी रस्ते विकसित केले जात आहेत. रस्ते विकसनाचा खर्च, तुलनेने कमी उपलब्ध तरतूद आणि जागा ताब्यात घेताना जागा मालकांची रोख मोबदल्याची मागणी अशा कारणांमुळे डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्यात मर्यादा येतात. अशा परिस्थितीत रस्ते विकसन खासगी सहभागातून करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत. या प्रस्तावाअंतर्गत रस्त्याच्या जागा एफएसआय आणि टीडीआर यांच्या मोबदल्यामध्ये ताब्यात घेतल्या जातात. रस्ते विकसनाचा खर्च विकसकास किंवा ठेकेदारास क्रेडिट नोट स्वरूपात देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सदर क्रेडिट नोट पुणे महापालिकेकडे असलेल्या बांधकाम परवानगी शुल्काच्या अंतर्गत वापरता येईल. तसेच ती क्रेडिट नोट हस्तांतरणीय असेल. त्यामुळे महापालिकेने हे पर्याय स्वीकारून रस्त्यांची कामे करणे सुरु केले आहे.

मात्र यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत स्वत: स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला प्रश्न विचारले. भिमाले यांनी सांगितले कि, शहरात १२ रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यातील ८ रस्त्यांची कामे झाली नाहीत. एखाद्या रस्त्याचे काम २० टक्के झाले आहे, तरीही तिथे विकसकाला ८० टक्के टीडीआर देण्यात आला आहे. किमान ५० टक्के रस्त्यांची कामे होणे अपेक्षित होते. तसे झाले नाही. त्यामुळे आता या रस्त्यांची पाहणी करणार असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले. पुढील आठवड्यात या रस्त्यांची पाहणी केली जाणार आहे, असे भिमाले म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: