PMC Standing Committee | अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून खड्ड्यांची पाहणी करावी | श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश

Homeadministrative

PMC Standing Committee | अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून खड्ड्यांची पाहणी करावी | श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश

Ganesh Kumar Mule Aug 06, 2026 9:07 PM

PMC Tender Policy | निविदेच्या दराबाबत नियमावली ठरवली जाणार | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती
Mayor Manjusha Nagpure on Standing Committee | ‘स्थायी समिती शहराच्या प्रश्नांसाठी, फक्त प्रभागासाठी नाही’ | महापौर मंजुषा नागपुरेंनी समिती सदस्यांचे टोचले कान
PMC Standing Committee | सुक्या कचऱ्याच्या वाहतूक व प्रक्रियेसाठी ६.८३ कोटींच्या ठेक्याचा प्रस्तावाला मान्यता | प्रस्तावाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने केला विरोध 

PMC Standing Committee | अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून खड्ड्यांची पाहणी करावी | श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश

पावसाचा जोर कमी होताच तातडीने दुरुस्ती करा

 

Pune Potholes – (The Karbhari News Service) – शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची केवळ तक्रारींची वाट न पाहता संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष पाहणी करावी. धोकादायक खड्ड्यांची तातडीने नोंद करून पाऊस थांबताच कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. तसेच खड्डे दुरुस्तीच्या कामांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष ठेवून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी साप्ताहिक बैठकीत प्रशासनाला दिले. (Pune PMC News)

बैठकीत शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येचा आढावा घेण्यात आला. अनेक ठिकाणी दुरुस्ती झाल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आपल्या हद्दीतील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्ड्यांचा अहवाल सादर करावा आणि त्याचा नियमित आढावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा, असे निर्देश देण्यात आले.

ते पुढे म्हणाले, “नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये, अपघात टळावेत आणि शहरातील रस्ते सुरक्षित राहावेत, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पावसाळा संपताच कायमस्वरूपी दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत. केवळ कागदोपत्री अहवाल न देता अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन परिस्थितीची खात्री करावी.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: