PMC Standing Committee | झाडणकामाच्या कंत्राटदारांना आता आठ टक्के ‘देखरेख शुल्क’ | महापालिकेचा निर्णय; मासिक देयकाच्या १० ऐवजी आठ टक्के रक्कम देणार

Homeadministrative

PMC Standing Committee | झाडणकामाच्या कंत्राटदारांना आता आठ टक्के ‘देखरेख शुल्क’ | महापालिकेचा निर्णय; मासिक देयकाच्या १० ऐवजी आठ टक्के रक्कम देणार

Ganesh Kumar Mule Sep 03, 2026 8:08 PM

PMC Shahari Garib Yojana | पॅनलवरील हॉस्पिटल मध्ये अॅडमिशनपूर्वीचे उपचारांचे बिल “अजितदादा पवार योजने”तून मिळणार नाही | प्रशासनाचा स्पष्ट अभिप्राय
Dr Dada Kodre | खाजगी रुग्णालयांसाठी ‘PMC Health-Ease’ – एक खिडकी प्रणाली | स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर
PMC Standing Committee | महिलांच्या नावावरील ५०० चौ. फुटांपर्यंतच्या मिळकतींना मिळकतकरात ५० टक्के सवलत | स्थायी समितीत प्रस्तावाला मान्यता

PMC Standing Committee | झाडणकामाच्या कंत्राटदारांना आता आठ टक्के ‘देखरेख शुल्क’ | महापालिकेचा निर्णय; मासिक देयकाच्या १० ऐवजी आठ टक्के रक्कम देणार

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) – शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या झाडणकामाच्या प्रायोगिक प्रकल्पातील कंत्राटदारांना कामाच्या देखरेखीसाठी देण्यात येणारे शुल्क कमी करण्यात येणार आहे. कंत्राटदारांच्या मासिक देयकाच्या १० टक्क्यांऐवजी आठ टक्के रक्कम ‘देखरेख शुल्क’ म्हणून देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार हा बदल करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (PMC Solid Waste Management)

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याबरोबरच कचऱ्याबाबतच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी महापालिकेने तीन महिन्यांचा झाडणकामाचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत झाडणकामासाठी कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या प्रायोगिक प्रकल्पात नगररोड-वाघोली, येरवडा-वडगावशेरी, ढोले पाटील रस्ता, कोथरूड-बावधन, औंध-बाणेर, छत्रपती शिवाजीनगर-घोले रस्ता, सिंहगड रस्ता, धनकवडी-कात्रज-आंबेगाव, वारजे-कर्वेनगर, हडपसर-मांजरी, वानवडी, कोंढवा-उंड्री, कसबा पेठ, बिबवेवाडी आणि आंबेगाव या क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे.

या भागांमध्ये झाडणकामासाठी वाढीव मनुष्यबळ उपलब्ध करून देताना संबंधित कंत्राटदारांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी मासिक देयकाच्या १० टक्के रक्कम देण्याचा प्रस्ताव यापूर्वी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्यास समितीने मान्यताही दिली होती. मात्र, प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सादर करताना अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी या शुल्काचा दर १० टक्क्यांवरून आठ टक्के करण्याची सूचना केली.

त्यानुसार महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सुधारित प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला. या प्रस्तावाला समितीने मंजुरी दिल्याने आता झाडणकामाच्या कंत्राटदारांना त्यांच्या मासिक देयकाच्या आठ टक्के रक्कमच कामाच्या देखरेखीसाठी मिळणार आहे. त्यामुळे प्रायोगिक प्रकल्पाच्या खर्चात काही प्रमाणात बचत होण्याची शक्यता आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: