PMC Audit Sub-Committee | आकाशचिन्ह विभागाच्या ४०४ कोटी वसुलीची ऑडीट उपसमितीत चर्चा करणार | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती 

Homeadministrative

PMC Audit Sub-Committee | आकाशचिन्ह विभागाच्या ४०४ कोटी वसुलीची ऑडीट उपसमितीत चर्चा करणार | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती 

Ganesh Kumar Mule Apr 17, 2026 8:00 AM

Pune city is now 5 stars! |Another honour in the veins of (PMC)
Pune Model School | उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण
Pune Road Devlopment | पुण्याच्या रस्ते विकासातील २ मोठे अडथळे दूर! | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती 

PMC Standing Committee | आकाशचिन्ह विभागाच्या ४०४ कोटी वसुलीची ऑडीट उपसमितीत चर्चा करणार | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

PMC Pune – (The Karbhari News Service) – लेखापरीक्षण अहवालात परवाना व आकाशचिन्ह विभागाकडील जाहिरात फलकांचे वसुलपात्र ४०४ कोटी रकमेपैकी फेब्रुवारी २०२६ अखेर प्रत्यक्ष वसूल झालेल्या रकमांची माहिती मुख्य लेखापरीक्षक यांनी आकाशचिन्ह विभागाला मागितली होती. मात्र विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता मुख्य लेखापरीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी ही बाब स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिली आहे. यावर स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि याबाबत येत्या ऑडीट उपसमितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ. (PMC Sky Sign Department)

पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडील जाहिरात फलक (होर्डिंग्ज) चे लेखापरीक्षण या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. लेखापरीक्षणात आढळून आलेल्या वसूलपात्र रकमा, आक्षेपार्ह व दोषास्पद बाबींचा अहवाल महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १०६ (१) (अ) नुसार २०२४ साली स्थायी समितीस सादर करण्यात आला होता. त्यामध्ये मागील अहवालातील वसूलपात्र १२६,४६,४९,९७९ ( एकशे सव्वीस कोटी सेहेचाळीस लाख एकोणपन्नास हजार नऊशे एकोणऐंशी ) व २०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधीतील वसूलपात्र २७८,०७,०३, ६१७ (. दोनशे अठठयाहत्तर कोटी सात लाख तीन हजार सहाशे सतरा फक्त) अशी एकूण वसूलपात्र ४०४,५३,५३,५९६ (चारशे चार कोटी त्रेपन्न लाख त्रेपन्न हजार पाचशे शहाण्णव फक्त ) पैकी फेब्रुवारी- २०२६ अखेर प्रत्यक्ष वसूल झालेली रक्कम याबाबतची तपशिलवार माहिती लेखापरीक्षण विभागास सात दिवसात सादर करणेबाबत १८ मार्च २०२६ रोजी कळविणेत आले होते. परंतु, अद्यापपर्यंत ही माहिती लेखापरीक्षण विभागास उपलब्ध करून देणेत आलेली नाही. ही बाब मुख्य लेखापरीक्षक यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिली आहे.

याबाबत अध्यक्ष भिमाले यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि, या विषयाची ऑडीट उपसमितीच्या बैठकीत चर्चा केली जाईल. विभागाने किती वसुली केली, वसुली का प्रलंबित राहिली, लेखापरीक्षक यांना का माहिती दिली जात नाही, या सर्व बाबीवर या बैठकीत चर्चा केली जाईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: