PMC Labour Welfare Department | वाढलेल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे | मुख्य कामगार अधिकारी यांचे आवाहन 

Homeadministrative

PMC Labour Welfare Department | वाढलेल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे | मुख्य कामगार अधिकारी यांचे आवाहन 

Ganesh Kumar Mule Apr 16, 2026 9:30 PM

Buying gold on Dhanteras |  धनत्रयोदशीला सोने खरेदी करताना या 3 गोष्टी लक्षात ठेवा | फसवणूक होणार नाही
Junior Pune Shree | पुणे जिल्हास्तरीय ज्युनिअर पुणे श्री स्पर्धेचे निकाल जाहीर!
PMC Solid Waste Management Department | शहरातील वर्दळीच्या तसेच कमर्शियल भागात स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती | घनकचरा व्यवस्थापन विभागाचा निर्णय

PMC Labour Welfare Department | वाढलेल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे | मुख्य कामगार अधिकारी यांचे आवाहन

 

Pune Heat – (The Karbhari News Service) –  यावर्षी राज्यात तसेच पुणे शहरात उष्णतेच्या लाटेची तीव्रता लक्षणीय वाढलेली असून, त्यामुळे कामगारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या सर्व विभागांतील कामगारांनी  आवश्यक काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे आवाहन मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी केला आहे. (Nitin Kenjale PMC)

– मार्गदर्शक सूचना-

१. वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात करावीत.
२. उष्णता शोषून घेणारी कपडे ( काळ्या अथवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सुती कपडे वापरावेत.
३. पाणी भरपूर प्यावे डीहायड्रेशन होऊ देऊ नये. गरज पडल्यास लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इ. प्यावे.
४. बाहेर (आउटडोर) काम करणाऱ्या सेवकांनी डोक्यावर टोपी/कॅप/स्कार्फ वापरावे.
५. दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत कार्यालयाच्या बाहेर काम असल्यास शक्य असल्यास कामाच्या वेळेत बदल करावा.
६. उष्माघात (Heat Stroke) ची लक्षणे जसे की चक्कर येणे, उलट्या होणे, जास्त घाम येणे, अंग गरम होणे इ. आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.
७. मद्यपान, कॅफिनयुक्त पेयांचे सेवन टाळावे.
८. क्षेत्रिय स्तरावर देखभाल दुरुस्तीच्या चालू असलेल्या मनपा च्या संबंधित विभागाने / संबंधित कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व सावलीची योग्य व्यवस्था करावी.
९. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामगारांच्या आरोग्याची/ वरील सूचनांची नियमित पाहणी करावी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0