Sunil Shinde | GloCon 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड

अनौपचारिक व सामायिक वाहतूक क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न आणि सामाजिक सुरक्षेला जागतिक व्यासपीठ मिळवून देणाऱ्या GloCon 2026 परिषदेसाठी सुनील शिंदे यांची निवड.

HomePolitical

Sunil Shinde | GloCon 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड

Ganesh Kumar Mule Oct 21, 2026 9:14 PM

Ganeshkhind Road Flyover | गणेशखिंड रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा ! उच्च न्यायालयाने 72 झाडे काढण्यावरील स्थगिती उठविली
Income Tax Eligible Pensioners | आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांनी आयकर गणना विकल्प २७ ऑक्टोबर पर्यंत कोषागारात सादर करण्याचे आवाहन
Pune Water Cut News | पुण्यातील काही भागात उद्या 5 तास पाणीपुरवठा बंद राहणार

Sunil Shinde | GloCon 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड

| ऑटो रिक्षा, ॲप-आधारित वाहतूक आणि PMPML कामगारांच्या संघटनात्मक कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

 

GloCon International Conference – The Karbhari News Service –  अनौपचारिक व सामायिक वाहतूक क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न, हक्क आणि सामाजिक सुरक्षेला जागतिक व्यासपीठ मिळवून देणाऱ्या GloCon 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF) यांच्या माध्यमातून त्यांची निवड करण्यात आली आहे.

दि. २६ ते २८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान थायलंडमधील बँकॉक येथे ही परिषद होणार आहे. जगभरातील कामगार नेते, संशोधक आणि वाहतूक क्षेत्रातील प्रतिनिधी यात सहभागी होणार असून, असंघटित वाहतूक कामगारांचे हक्क, रोजगाराची अनिश्चितता, सामाजिक सुरक्षा आणि संघटनात्मक अधिकार यांवर चर्चा होणार आहे.

सुनील शिंदे यांनी ऑटो रिक्षाचालक, ओला-उबेरसारख्या ॲप-आधारित वाहतूक सेवांतील चालक तसेच PMPML मधील चालक व कर्मचाऱ्यांच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने काम केले आहे. या विविध घटकांतील कामगारांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडून त्यांच्या हक्कांसाठी पाठपुरावा करण्याच्या त्यांच्या कार्याची या निवडीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे.

या परिषदेमुळे भारतीय वाहतूक कामगारांचे प्रश्न जागतिक स्तरावर मांडण्याची आणि विविध देशांतील कामगार संघटनांशी अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी सुनील शिंदे यांना मिळणार आहे. असंघटित व ॲप-आधारित वाहतूक क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा, न्याय्य रोजगार आणि संघटनात्मक हक्क मिळवून देण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: