PMC Ward 32 – Warje Popular Nagar | प्रभाग क्रमांक – ३२ – वारजे – पॉप्युलर नगर | कशा आहेत प्रभागाच्या हद्दी आणि रचना ? सविस्तर जाणून घ्या 

Homeadministrative

PMC Ward 32 – Warje Popular Nagar | प्रभाग क्रमांक – ३२ – वारजे – पॉप्युलर नगर | कशा आहेत प्रभागाच्या हद्दी आणि रचना ? सविस्तर जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule Sep 10, 2025 8:06 AM

Nitin Gadkari on Pune Traffic | ‘तीन उन्नत मार्गांमुळे पुण्याची वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार’ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Sanjay Raut Pune Tour | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात लवकरच शहर नेतृत्व फेरबदल – खासदार संजय राऊत
Bhima Koregaon | भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम – डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सामाजिक संस्थांचा सहभाग – सलग आठ वर्ष उपक्रम

PMC Ward 32 – Warje Popular Nagar | प्रभाग क्रमांक – ३२ – वारजे – पॉप्युलर नगर | कशा आहेत प्रभागाच्या हद्दी आणि रचना ? सविस्तर जाणून घ्या

 

PMC Pune Election 2025 – (The Karbhri News Service) – पॉप्युलर नगर पासून ते रुणवाल कॉम्प्लेक्स पर्यंत वारजे – पॉप्युलर नगर प्रभागाची व्याप्ती आहे. प्रभागासाठी एकूण ११ हरकती आणि सूचना आल्या आहेत. या प्रभागाच्या हद्दी, रचना आणि व्याप्ती सविस्तर जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation – PMC Election 2025)

 

प्रभाग क्रमांक – ३२ – वारजे – पॉप्युलर नगर

लोकसंख्या एकूण – ८२५३७ – अ. जा. -९९८२ – अ. ज. १४३६

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४

 

व्याप्ती: पॉप्युलर नगर, आपटे सोसायटी, विठ्ठलनगर, वाराणसी सोसायटी, गोकुळ नगर, ज्ञानेश सोसायटी, वारजे गावठाण, शिवणे (पार्ट), माळवाडी, रामनगर, चैतन्य नगरी, नादब्रम्ह सोसायटी, ईशान नगरी, सिप्ला फौंडशन, तेजोवलय, आदित्य गार्डन सिटी, अतुल नगर, न्यू अहिरे पुर्नवसन, ओव्हल नेस्ट सोसायटी, रुणवाल कॉम्प्लेक्स इ.

उत्तर: मौजे बावधन खुर्द, मौजे वारजे व मौजे कोथरुडची हद्द एकमेकास जेथे मिळतात तेथून पूर्वेस मौजे वारजे व मौजे कोथरुड हद्दीने नादब्रम्ह सोसायटी, चैतन्य नगरी सोसायटी यांचे पूर्वेकडील रस्त्याच्या/हद्दीच्या सरळ रेषेस (आकाशनगर ची पश्चिमेकडील हद्द, यशवंत चोरगे यांच्या मिळकतीच्या पश्चिमेकडील हद्द) मिळेपर्यंत.

पुर्व: मौजे वारजे व कोथरुडची हद्द नादब्रम्ह सोसायटी, चैतन्य नगरी सोसायटी यांचे पूर्वेकडील रस्त्याच्या / हद्दीच्या सरळ रेषेस (आकाशनगर ची पश्चिमेकडील हद्द, यशवंत चोरगे यांच्या मिळकतीच्या पश्चिमेकडील हद्द) जेथे मिळते तेथून दक्षिणेस सदर हद्दीने / रस्त्याने पुढे नादब्रम्ह सोसायटी, चैतन्य नगरी सोसायटी यांचे हद्दीने कॅनॉल रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस कॅनॉल रस्त्याने कात्रज देहूरोड बायपास हायवेस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणपूर्वेस कर्वे रस्ता ओलांडून कात्रज देहूरोड बायपास रस्त्याने मूठा नदीस पुलाजवळ मिळेपर्यंत.

दक्षिण: कात्रज देहूरोड बायपास रस्ता मूठा नदीस पूलाजवळ जेथे मिळतो तेथून पश्चिमेस मुठा नदीने तेथून नांदेड शिवणे रस्त्यास पुलावर मिळेपर्यंत.

पश्चिमः मुठा नदी नांदेड शिवणे रस्त्यास पुलावर जेथे मिळते, तेथून उत्तरेस नांदेड शिवणे रस्त्याने एन. डी. ए. रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस एन. डी. ए. रस्त्याने सदगुरू रेसिडेन्सी सोसायटीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस व पुढे पूर्वेस सद्गुरू रेसिडेन्सी सोसायटीच्या आणि दुधाने हाईटसच्या पूर्वेकडील हद्दीने एन.डी. ए. रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस एन. डी. ए. रस्त्याने शिवणे – वारजे हद्दीपर्यंत, तेथून उत्तर-पश्चिमेस सदर हद्दीने मौजे बावधन खुर्दच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस मौजे वारजे व मौजे बावधन खुर्दच्या हद्दीने मौजे कोथरुडच्या हद्दीस मिळेपर्यंत.

 

The Karbhari - PMC Pune Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: