Santosh Deshmukh Case | दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकार मधून बाहेर पडावे | मराठा क्रांती मोर्चा ची मागणी

HomeBreaking News

Santosh Deshmukh Case | दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकार मधून बाहेर पडावे | मराठा क्रांती मोर्चा ची मागणी

Ganesh Kumar Mule Mar 04, 2025 8:41 PM

Ajit Pawar | प्रशासकीय इमारतीचे कामे करतांना आगामी १०० वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा | अजित पवार
ITI Training Center Yerawada |  MLA Sunil Tingre |  ITI Training Center to be set up at Yerawada
Ajit Pawar Maharashtra Tour | विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून शरद पवारांच्या निर्णयाचे स्वागत

Santosh Deshmukh Case | दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकार मधून बाहेर पडावे | मराठा क्रांती मोर्चा ची मागणी

 

Maratha Kranti Morcha – (The Karbhari News Service) – महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व अजित पवार (Ajit Pawar) हे मराठा समाजाचे असून थोडी जरी नैतिकता या दोघांमध्ये असेल तर मराठा समाजाच्या एका सरपंचाचा निर्घृण खुणाच्या आरोपीला मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळातून ताबडतोब या दोघांनी राजीनामा देऊन सरकार मधून बाहेर पडावं आणि महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करावा. अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) चे समन्वयक सचिन आडेकर (Sachin Adekar ) यांनी केली आहे. (Pune News)

राज्यात गाजत असलेल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने मंगळवारी आंदोलन केले. राज्याच्या ठाणे व अन्य जिल्ह्यातही शिंदेसेनेच्या वतीने असेच आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या मुख्यालयातूनच आंदोलन करण्याचे आदेश दिले गेले होते अशी माहिती मिळाली. त्यात वाल्मिक कराड याच्या नावाचा उल्लेख करत आरोपींनी फाशीची शिक्षेची मागणी करण्यात आली.

पुण्यात केळकर चौकात पक्षाच्या शहर शाखेने मंगळवारी दुपारी १ वाजता आंदोलन केले. या घटनेच्या आडून शिंदेसेनेचा एनसीपी ला शाह देण्याचा प्रयत्न असलेल्यी चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे.

दरम्यान मराठा क्रांती मोर्चाने दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सरकार मधून बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.

—-

मस्साजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भातील फोटो मीडियावर आल्यानंतर अतिशय संताप जनक, अशी भावना महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे मराठा समाजाचे असून थोडी जरी नैतिकता या दोघांमध्ये असेल तर मराठा समाजाच्या एका सरपंचाचा निर्घृण खुणाच्या आरोपीला मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून ताबडतोब या दोघांनी राजीनामा देऊन सरकार मधून बाहेर पडावं आणि महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करावा.

सचिन आडेकर, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: