Pune Congress on PMC Election | निवडणुका होवोत अथवा न होवोत जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी या पुढे तीव्र लढा उभारणार व प्रशासनाचा भ्रष्ट कारभार बाहेर काढणार | काँग्रेस

HomeBreaking News

Pune Congress on PMC Election | निवडणुका होवोत अथवा न होवोत जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी या पुढे तीव्र लढा उभारणार व प्रशासनाचा भ्रष्ट कारभार बाहेर काढणार | काँग्रेस

Ganesh Kumar Mule Mar 04, 2025 9:55 PM

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | काँग्रेस कडून पुणे लोकसभा समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम यांच्याकडे!
Soniya Gandhi | Rahul Gandhi | भाजपच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही
Pimpari Congress | पिंपरी शहरात काँग्रेसला मतदार संघ मिळण्याचे राज्य नेतृत्वाकडून संकेत

Pune Congress on PMC Election | निवडणुका होवोत अथवा न होवोत जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी या पुढे तीव्र लढा उभारणार व प्रशासनाचा भ्रष्ट कारभार बाहेर काढणार | काँग्रेस

 

MPCC – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यावर संपूर्णपणे राज्यशासनाचे नियंत्रण आहे. महानगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महानगरपालिकेतील प्रशासन बिघडलेले असून सर्वसामान्य जनतेला सोयी – सुविधा मिळत नाहीत व त्यांना त्रास सहन करावा लागतो. भाजपा व महायुतीच्या मर्जीतले प्रशासन मनमानी कारभार करीत आहे. तसेच दिवसेंदिवस शैक्षणिक, आरोग्य, पाणी, रस्ते व सुरक्षेचा प्रश्न त्याचबरोबर पुण्यातील भाजप नेत्यांच्या आशिर्वादाने महानगरपालिकेत होणारा भ्रष्टाचाराचा प्रश्न भेडसावत आहे, म्हणून या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी मा. बी. एम. संदिप म्हणाले की, ‘‘सत्तेत येण्या अगोदर ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ असे मोदी सरकारने जाहिर केले होते. परंतु आता महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश भ्रष्टाचाराचे कुरण झाला असून भेष्ट व आत्याचारी मंत्र्याच्या विरोधात हे भाजप सरकार कोणत्याही कारवाया करताना दिसत नसल्याचे महाराष्ट्रातील अनेक प्रकरणातून दिसून आले आहे. तीन महिने एका मंत्र्यांचा पुरावे असताना राजीनामा न घेणे तसेच कोर्टाने ताशेरे ओढलेल्या मंत्र्यांस अभय देणे हे त्याचे धोतक असल्याचे बी. एम. संदिप यांनी सांगितले.

या पुढे काँग्रेस पक्ष निवडणुका होवोत अथवा न होवोत जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी या पुढे तीव्र लढा उभारणार व प्रशासनाचा भ्रष्ट कारभार बाहेर काढणार असे प्रतिपादन बी. एम. संदिप यांनी केले.’’

यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुण्यातील ज्वलंत प्रश्नांवरती भाष्य करताना सांगितले की, वाहतुक, पाणी, ड्रेनेज, खड्डे पडलेले रस्ते, निवडणुकी आगोदर लाडकी झालेली बहिण निवडणुकीनंतर तीची पात्रता तपासण्याचे काम या कुचकामी सरकारने केले आहे. तीन ते चार महिन्यांपासून संजय गांधी योजनेतील अंध, अपंग, विधवा, निराधार, ज्येष्ठ नागरिक यांच्या पेन्शन्स गेल्या तीन महिन्यांपासून डीबीटी च्या नावाखाली थांबविण्यचे काम या भाजप सरकारने केले आहे.

महानगरपालिकेतील अनेक प्रकरणात भ्रष्टाचार उघड झाला असून त्याच्यातील दोषींवर कोणतीही कारवाई होत नाही अशा सर्व भ्रष्टाचाराच्या विरोधात व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात यापुढे काँग्रेस पक्ष तीव्र लढा देणार आहे. पुणे शहरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असून त्याच्या विरोधातही महिला सुरक्षेच्या बाबतीत काँग्रेस पक्ष कटिबध्द असणार आहे.’’

यानंतर माजी आमदार दिप्ती चवधरी, नगरसेवक अविनाश बागवे यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित दरेकर यांनी केले तर आभार भवानी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सुजित यादव यांनी मानले.

यानंतर पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, मेहबुब नदाफ, प्राची दुधाने, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्‍हाळ, राज अंबिके, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, अक्षय जैन, संतोष हंगरगी, सदानंद शेट्टी, नीता रजपूत, सुनिल शिंदे, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, रविंद्र माझिरे, विशाल जाधव, हेमंत राजभोज, संतोष आरडे, रमेश सकट, दिलीप तुपे, रमेश सोनकांबळे, अक्षय माने, संतोष पाटोळे, दिलीप तुपे, समीर शेख, सेल्वराज ॲन्थोनी, अश्विनी डॅनिलय लांडगे, विल्सन चंदवेल, संदिप मोकाटे, सचिन दुर्गाडे, प्रदिप परदेशी, गणेश गुगळे, इरफान शेख, मतीन शेख, द. स. पोळेकर, राजेंद्र शिरसाट, सीमा सावंत, प्रकाश पवार, मंदा जाधव, ज्योती परदेशी, शोभा आरूडे, प्रियंका मधाळे, कविता भागवत, कांचन बालनायक, शारदा वीर, वाल्मिक जगताप, गुलाब नेटके, हरिदास चव्‍हाण, नारायण पोटोळे, रवि आरडे, अविनाश अडसूळ, अनिल धिमधिमे, शिलार रतनगिरी, भगवान कडू, भुषण रानभरे, संदिप कांबळे, ॲड. नंदलाल धिवार, ॲड. रमेश पवळे, किशोर मारणे, मीना हुबळीकर आदींसह असंख्य काँग्रेसजन सदर मोर्चात सहभागी झाले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: