PMC Retirement July 2026 | पुणे महापालिकेचे 62 अधिकारी-कर्मचारी जुलैमध्ये सेवानिवृत्त!

Homeadministrative

PMC Retirement July 2026 | पुणे महापालिकेचे 62 अधिकारी-कर्मचारी जुलैमध्ये सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule Aug 03, 2026 1:38 PM

Pune PMC News | पुणे महापालिकेत साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन
PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा बुधवारी सन्मान
PMC Retired Employees | फेब्रुवारी महिन्यात पुणे महापालिकेचे 39 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त

PMC Retirement July 2026 | पुणे महापालिकेचे 62 अधिकारी-कर्मचारी जुलैमध्ये सेवानिवृत्त!

| कामगार कल्याण विभागाकडून सेवापूर्ती समारंभाचे आयोजन

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service)  – पुणे महानगरपालिकेतील 62 अधिकारी आणि कर्मचारी जुलै 2026 महिन्यात  सेवानिवृत्त झाले. त्यांच्या गौरवार्थ महापालिका कामगार कल्याण विभागाच्या वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Labour Welfare Department)

या समारंभाला उप आयुक्त विजय लांडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यावेळी त्यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कोणत्याही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला अडचण आल्यास कामगार कल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता तथा प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड, कार्यकारी अभियंता शरद खारगे, उप अभियंता ज्योती वेदपाठक, अधीक्षक लीला परदेशी, सामाजिक कार्यकर्ते पाटोळे आणि पाणीपुरवठा विभागातील दत्तात्रय गवारी यांचा समावेश होता. या सर्वांनी महापालिकेतील प्रदीर्घ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि महापालिकेचे आभार मानले.

समारंभात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनीही भावना व्यक्त केल्या. मानसी सोनवणे आणि तेजल गवारे या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलींनी आपल्या वडिलांच्या आणि महापालिकेच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अर्चना खारगे यांनी आपल्या पतीच्या आणि महापालिकेच्या प्रवासाबद्दल आभार मानून एक सुंदर कविता सादर केली.

प्रमुख पाहुणे विजय लांडगे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले. पेन्शनचे कागदपत्रे लवकर जमा करावीत, मनातील इच्छा पूर्ण कराव्यात, तसेच दररोज किमान एक तास व्यायाम करून आरोग्याची काळजी घ्यावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले. त्यांनी सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शॉल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका जोशी यांनी केले. तर आयोजन अमित चव्हाण आणि महेश मुंडलिक यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: