Bhavani Peth Ward office | विकेन्द्रित मार्फत आलेल्या विकास कामांची दक्षता मार्फत तपासणी झाल्यानंतरच ठेकेदारांना बिल अदा करावे | तुषार पाटील यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

Homeadministrative

Bhavani Peth Ward office | विकेन्द्रित मार्फत आलेल्या विकास कामांची दक्षता मार्फत तपासणी झाल्यानंतरच ठेकेदारांना बिल अदा करावे | तुषार पाटील यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

Ganesh Kumar Mule Mar 04, 2025 7:48 PM

Charge | PMC Pune | समाज विकास आणि समाज कल्याण विभागाची जबाबदारी आशा राऊत यांच्याकडे
Service Cable | PMC Commissioner | सेवा वाहिन्या टाकणेसाठी शासकीय संस्थांना देण्यात येणारी सवलत रद्द करण्याचा प्रस्ताव तसाच पडून  | प्रशासनाचा प्रस्ताव असतानाही आयुक्त निर्णय घेईनात 
PMC General Administration Department | सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांकडून दुजाभावाची वागणूक | रमेश शेलार यांचा आरोप

Bhavani Peth Ward office | विकेन्द्रित मार्फत आलेल्या विकास कामांची दक्षता मार्फत तपासणी झाल्यानंतरच ठेकेदारांना बिल अदा करावे

| तुषार पाटील यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

 

Tushar Patil BJP – (The Karbhari News Service) – भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय कडील विकेन्द्रित मार्फत आलेल्या विकास कामांची दक्षता मार्फत तपासणी झाल्यानंतरच बिल अदा करावे. अशी मागणी भाजपा शहर उपाध्यक्ष तुषार पाटील (Tushar Patil BJP) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

तुषार पाटील यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदना नुसार भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पुणे मनपा चे प्रभाग क्र १७, १८, १९, हे प्रभाग येत असून त्यामध्ये विविध विकास कामांना विकेन्द्रित मार्फत निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. त्यामधील बहुतांश कामे ही देखभाल दुरुस्ती ची असल्याने त्यांना त्रयस्त गुणवत्ता चाचणी करणारी संस्था नसल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने काम न करता किंवा कामाचा दर्जा न पाहता तसेच अर्धवट काम करून पूर्ण बिले काढण्याचा प्रकार या आधी देखील झाला असल्याने या वर्षी सन २०२४-२५ मध्ये देखील होण्याची दाट शक्यता आहे.

पाटील यांनी म्हटले आहे की, तरी भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय कडील ज्या विकास कामांना विकेन्द्रित मार्फत निधी आलेला आहे त्या सर्व विकास कामांची समक्ष जागेवर पाहणी करून त्या कामांची दक्षता मार्फत चौकशी करून काम पूर्व गणन पत्र नुसार पूर्ण झाले आहे किंवा नाही याची खातरजमा करूनच संबंधित ठेकेदार यांना बिल अदा करण्यात यावे. अगर विकास कामांमध्ये तफावत आढळून आल्यास बिल अदा करू नये. तसेच ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून पुणे मनपा च्या काळ्या यादी मध्ये समाविष्ट करण्याची कारवाई करण्यात यावी. अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0