PMC Krida Sankul | शहरातील 19 क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीला पुणे महापालिकेला हवेत साडेपाच कोटी 

HomeBreaking Newsपुणे

PMC Krida Sankul | शहरातील 19 क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीला पुणे महापालिकेला हवेत साडेपाच कोटी 

गणेश मुळे Jan 30, 2024 1:52 PM

PM Modi Pune Tour Expenditure | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याचा खर्च 1 कोटी 15 लाख! 
PMC Pune Flyover | दांडेकर पूल आणि बिंदू माधव ठाकरे चौकात उभारले जाणार ग्रेड सेपरेटर/उड्डाणपूल  | प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची केली जाणार नियुक्ती 
PMC Solid Waste Management | स्वच्छतेचं दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामुळेच महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार | आयुक्त विक्रम कुमार 

PMC Krida Sankul | शहरातील 19 क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीला पुणे महापालिकेला हवेत साडेपाच कोटी

| प्रशासनाकडून वर्गीकरणाचे प्रस्ताव

Sport Complex in Pune | PMC Swimming Pool |  पुणे | शहरात पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) क्रीडा संकुले (PMC Krida Sankul), बॅडमिंटन हॉल  (PMC Badminton Hall) आणि जलतरण तलाव (PMC Swimming Pool) आहेत. मात्र त्यांची देखभाल दुरुस्ती न केल्याने त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे पुणे महापालिका शहरातील 19 क्रीडा संकुलांची दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी साडे पाच कोटींची आवश्यकता आहे. हा निधी वर्गीकरणाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. त्यासाठी स्थायी समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. (PMC Pune News Today)
क्रीडा संकुले वापरता येत नसल्याची तक्रार नागरिक तसेच खेळाडू करतात. त्यामुळे महापालिकेने यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कामांसाठी पुरेशी तरतूद उपलब्ध नाही. यासाठी एकूण साडेपाच कोटी हवे आहेत. याआधी पहिल्या टप्प्यात  10 क्रीडा संकुलाची दुरुस्ती निधी वर्ग करण्याबाबत स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. हा निधी मेडिकल कॉलेज (PMC Medical College) च्या कामातून वर्ग केला गेला.  यासाठी 1 कोटी 94 लाखाची यासाठी आवश्यकता होती. हा निधी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय च्या कामातून घेतला गेला.
त्यानंतर आता साडेतीन कोटी रुपये वर्गीकरणाचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यामध्ये 9 क्रीडा संकुलांचा समावेश आहे. विविध कामांतून हा निधी वर्ग केला जाणार आहे.
ही आहेत क्रीडा संकुले 
1. राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल, घोरपडी
2. न वि गाडगीळ जलतरण तलाव, शनिवार पेठ
3. बॅडमिंटन हॉल, कर्वेनगर
4. जलतरण तलाव व व्यायामशाळा, शिवाजीनगर
5. नांदे जलतरण तलाव, शिवाजीनगर
6. विठ्ठलराव क्रीडा संकुल
7. कै रामचंद्र (आप्पा) बनकर क्रीडा संकुल
8. कै शारदाबाई गोविंदराव पवार क्रीडा संकुल, पद्मावती
9. योगगुरू रामदेवबाबा क्रीडा संकुल, तळजाई