MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

BARTI Pune Fellowship   फेलोशिप बाबत बार्टीचा सकारात्मक प्रतिसाद ; पीएचडी धारकांचे आमरण उपोषण स्थगित

HomeपुणेBreaking News

BARTI Pune Fellowship फेलोशिप बाबत बार्टीचा सकारात्मक प्रतिसाद ; पीएचडी धारकांचे आमरण उपोषण स्थगित

गणेश मुळे Jan 30, 2024 9:08 AM

BARTI |Student Hunger Strike | बार्टीच्या आश्वासनानंतर संशोधक विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण मागे
UPSC Preparation | BARTI | ‘बार्टी’मार्फत आयोजित यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करा
School of Sweepers Children | केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांची सफाई कामगारांच्या मुलांच्या शाळेला भेट

BARTI Pune Fellowship   फेलोशिप बाबत बार्टीचा सकारात्मक प्रतिसाद ; पीएचडी धारकांचे आमरण उपोषण स्थगित

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची यशस्वी मध्यस्थी

 

BARTI pune Fellowship | फेलोशीपच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले पीएचडी धारकांचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे. फेलोशीपपासून वंचित राहिलेल्या ४६ पीएचडी धारकांबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल. पीएचडी नोंदणी पासून ते आतापर्यंतचा प्रगती अहवाल स्वीकारून पुढील कार्यवाही करू, असे लेखी आश्वासन बार्टीकडून मिळाल्याने पीएचडी धारकांनी सुरू केलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. या प्रकरणी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी यशस्वी मध्यस्थी करत विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा केला. (BARTI Pune Fellowship)

 

Barti Pune fellowship

बार्टीचे संचालक सुनील वारे यांनी विद्यार्थ्यांना केलेले आवाहन

पुण्यात पीएचडीचे संशोधक विद्यार्थी गेल्या सात दिवसांपासून बार्टी संस्थेबाहेर आमरण उपोषणाला बसले होते. बार्टी या संस्थेमार्फत मंजूर स्कॉलरशिप न मिळाल्याने हे आंदोलन सुरू होते. आंदोलन करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत ठिय्या आंदोलन केले. या घटनेनंतर कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन मध्ये आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिस घेऊन गेले. या बाबतची माहिती मिळताच डॉ. धेंडे यांनी प्रत्यक्ष हजर राहून विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल न करण्याची विनंती पोलिस प्रशासनाला केली. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे विद्यार्थी संतप्त असल्याचे निदर्शनास आणले.

Barti pune

डॉ सिद्धार्थ धेंडे यांची मध्यस्थी यशस्वी

 

यावेळी बार्टीचे अधिकारी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये बोलावून पोलिसांसमोर चर्चा घडवून आणल्या. विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना डॉ. धेंडे यांनी बार्टीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शासनाने नेमलेल्या समिती पुढे हा विषय ठेवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन बार्टीच्या अधिकाऱ्यांनी दिले. तसेच संशोधक विद्यार्थ्यांचे प्रबंध (थीसिस) बार्टी कडून स्वीकारले जातील, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांना आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करून उपोषण मागे घेण्याची विनंती डॉ. धेंडे यांनी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देखील हे आंदोलन स्थगित केले आहे.

या वेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये रंजना कांबळे, सारिका गोंडाणे, मानसी वानखेडे, कविता गाडगे, अश्विनी कांबळे, प्रदीप त्रिभुवन, ईश्वर अडसूळ आदीसह विद्यार्थी व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच बार्टीचे महासंचालक सुनील वारे, डॉ. अंकुश गायकवाड, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक सातपुते आदीसह कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
—————-

 केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली दखल* –

या आंदोलन दरम्यान डॉ. धेंडे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना संपर्क करून संबंधित परिस्थितीबाबत माहिती दिली. मंत्री आठवले यांनी देखील फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.
——————–

पीएचडी धारकांना बार्टी मार्फत मिळणारी फेलोशीप रखडली आहे. शासनाने फेलोशीप बाबत समान धोरण आखण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यांचा अहवाल घेऊन अर्थ मंत्र्यांकडे पाठवून फेलोशिपचे धोरण ठरविण्यात येणार आहे. मात्र याची कार्यवाही धिम्या गतीने सुरू असल्याने विद्यार्थी संतप्त आहेत. फेलोशीप मिळावी यासाठी मी स्वतः देखील शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. शासनाने या प्रकरणी स्थापन केलेल्या समितीची पुढील आठवड्यात मुंबईत भेट घेऊन प्रश्न मार्गी लावणार आहे.

– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
———————————–

Breaking News 6025 Education 585 Political 2777 social 3517 पुणे 6346 barti 7 BARTI Notice Board 1 Barti pune 4 BARTI Pune Address 1 BARTI Pune Application Form 2024 last date 1 BARTI Pune Camp 1 BARTI Pune Free Courses 1 BARTI Pune MPSC Classes 1 BARTI Pune Recruitment 1 BARTI Pune Station 1 BARTI Pune Students Agitation 1 BARTI Student Login 1 Dr. Siddharth Dhende 68 Marathi news 2885 pune news 1979 Pune Scholarship 1 www.barti.in MPSC 1 www.barti.in registration 1 www.barti.in registration login 1 www.barti.Maharashtra.gov.in caste validity 1 बार्टी परीक्षेसाठी कोण अर्ज करू शकते? 1 बार्टी पुणे 1 बार्टी फेलोशिप म्हणजे काय? 1

AUTHOR: गणेश मुळे

गणेश मुळे 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC Krida Sankul | शहरातील 19 क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीला पुणे महापालिकेला हवेत साडेपाच कोटी 
Older Post
FIR against MLA Ravindra Dhangekar in the case of insulting PMC Chief Engineer!
Quote Widget Background

MAIN QUOTE

घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय.
- सावित्रीबाई फुले

RECENTS

Sharad Pawar | साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला- ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार

Sharad Pawar | साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला- ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार

Pune PMC News | पालखी नियोजन बाबत महापालिका आणि पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक!

Pune PMC News | पालखी नियोजन बाबत महापालिका आणि पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक!

MNS on Hindi Language | खबरदार! हिंदी भाषेची पुस्तके छापली आणि वितरित केली तर.. | मनविसेचे बालभारती समोर आंदोलन 

MNS on Hindi Language | खबरदार! हिंदी भाषेची पुस्तके छापली आणि वितरित केली तर.. | मनविसेचे बालभारती समोर आंदोलन 

Pune Traffic Update | पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Pune Traffic Update | पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Add title

Sharad Pawar | साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला- ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार
Books

Sharad Pawar | साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला- ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार

Sharad Pawar | साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला- ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार | सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे साळुंखे, [...]
Read More
Pune PMC News | पालखी नियोजन बाबत महापालिका आणि पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक!
administrative

Pune PMC News | पालखी नियोजन बाबत महापालिका आणि पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक!

Pune PMC News | पालखी नियोजन बाबत महापालिका आणि पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक!   Palkhi Sohala 2025 - (The Karbhari News Service) - पुणे श [...]
Read More
MNS on Hindi Language | खबरदार! हिंदी भाषेची पुस्तके छापली आणि वितरित केली तर.. | मनविसेचे बालभारती समोर आंदोलन 
Breaking News

MNS on Hindi Language | खबरदार! हिंदी भाषेची पुस्तके छापली आणि वितरित केली तर.. | मनविसेचे बालभारती समोर आंदोलन 

MNS on Hindi Language | खबरदार! हिंदी भाषेची पुस्तके छापली आणि वितरित केली तर.. | मनविसेचे बालभारती समोर आंदोलन   MNVS - (The Karbhari News S [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved