PMRDA Pune | अनधिकृत सहा मजली इमारत जमीनदोस्त

Homeadministrative

PMRDA Pune | अनधिकृत सहा मजली इमारत जमीनदोस्त

Ganesh Kumar Mule Jun 05, 2025 10:02 PM

Illegal Construction | उंड्रीमध्ये दोन अनधिकृत इमारतींवर पालिकेची कारवाई
PMRDA | PMRDA च्या बांधकामांमधील अनियमितता तपासण्यासाठी लवकरच समिती | उद्योग मंत्री उदय सामंत
Pune Municipal Corporation | PMRDA | नगर रोड वरील १०७ अनधिकृत बांधकामावर कारवाई 

PMRDA Pune | अनधिकृत सहा मजली इमारत जमीनदोस्त

 

PMRDA Pune News – (The Karbhari News Service) – गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत होर्डिंग आणि बांधकामांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून धडक कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी (दि.५) मारुंजी भागातील सर्वे नंबर ४५/१/२ मधील मोठ्या अनाधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या इमारतीवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली. (Pune News)

पीएमआरडीए हद्दीत अनधिकृत बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याची दखल घेत अशा बांधकामावर थेट कारवाई सुरू आहे. त्यानुसार गुरुवारी मारुंजी परिसरातील अनधिकृत असलेल्या सर्वे नंबर ४५/१/२ या भागातील ६ मजली इमारतीवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली.

पीएमआयडीएने केलेला सर्वेक्षणात ९६७ अनाधिकृत होर्डिंग आढळून आल्या आहेत. गत काही दिवसात १२२ होर्डिंग अनाधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या पथकामार्फत काढण्यात आल्या आहे. रहदारीस अडथळ तसेच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा हवेली, भोर, मुळशी, पुरंदर, दौंड आदी भागातील अनाधिकृत होर्डिंगवर धडक कारवाई करण्यात येत आहे.

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार संबंधित कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाई प्रभारी महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, उपजिल्हाधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील, प्रमोद कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी प्राधिकरणाचे तहसीलदार रविंद्र रांजणे, सचिन म्हस्के, पोलीस निरिक्षक महेशकुमार सरतापे यांच्यासह स्थानिक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: