Mula, Mutha and Indrayani rivers : Water hyacinth : मुळा, मुठा आणि इंद्रायणी नद्यांमधील जलपर्णी जैविक पद्धतीने हटविणार

HomeपुणेBreaking News

Mula, Mutha and Indrayani rivers : Water hyacinth : मुळा, मुठा आणि इंद्रायणी नद्यांमधील जलपर्णी जैविक पद्धतीने हटविणार

Ganesh Kumar Mule Mar 08, 2022 3:25 PM

Tukaram Maharaj Bij | इंद्रायणी नदीचे पाणी पिण्याकरीता वापरण्यास मनाई  | श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू
Indrayani River Improvement Project | इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी 500 कोटींचा आराखडा | 18 STP प्लांट बसवण्यात येणार
Indrayani River Pollution | इंद्रायणी नदीमध्ये प्रदूषित सांडपाणी सोडणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

मुळा, मुठा आणि इंद्रायणी नद्यांमधील जलपर्णी जैविक पद्धतीने हटविणार

: नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आश्वासन

पुणे – नद्यांमधील जलपर्णी हटविण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जैविक पद्धतीचाच वापर केला जाईल, असे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील चर्चेत आज (मंगळवारी) दिले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये नद्यांमधील जलपर्णीच्या त्रासासंबंधिची लक्षवेधी सूचना मी विधानसभेत मांडली. यावर सभागृहात ५०मिनिटे गांभिर्याने चर्चा झाली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मुळा, मुठा आणि इंद्रायणी नद्यांचे ५३ किलोमीटर पैकी ३० किलोमीटर क्षेत्र जलपर्णीने व्यापून टाकले आहे. यामुळे डासांचा फैलाव वाढून नदीकाठच्या रहिवाशांमध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव आढळतो. नदीपात्रात मासेमारीही अशक्य झाली आहे. वॉटर स्पोर्ट्स, पर्यटन सुविधाही तिथे करता येत नाहीत. नदीच्या पाण्याची ऑक्सिजन पातळी खालावते, त्यामुळे पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि पर्यावरणाचीही हानी होते.

नदीपात्रातील जलपर्णी हटविण्यासाठी महापालिकांनी यांत्रिक पद्धतीचा वापर केलेला आहे. त्यात कोट्यवधी रुपये खर्च होऊनही जलपर्णी हटलेली नाही. उल्हास नदीतील जलपर्णी हटविण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर करण्यात आला आणि जलपर्णी हटविली गेली. रासायनिक औषधींपेक्षा जैविक पद्धतीचा वापर हानीकारक ठरत नाही असेही सिद्ध झाले आहे, असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

उल्हास नदीतील जैविक पद्धतीचा वापर आणि त्याचा झालेला फायदा मी स्वतः पाहिलेला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नद्यांमधील जलपर्णी हटविण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर करण्याची सूचना आमदार शिरोळे यांनी केली, ती योग्य आहे. शासन त्याप्रमाणेच कार्यवाही करण्याच्या सूचना देईल, असे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0