Voter Registration | राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करण्याचे आवाहन

HomeपुणेBreaking News

Voter Registration | राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करण्याचे आवाहन

गणेश मुळे Jul 05, 2024 4:10 PM

Ramdas Athawale | आंबेडकरी समाज एकजुटीने महायुती सोबत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले | सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची रॅली
Vande Bharat Express | पुणे- हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ!
Pahalgam Terror Attack | १८३ प्रवासी महाराष्ट्रात परतले, शुक्रवारी २३२ येणार | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Voter Registration | राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करण्याचे आवाहन

| राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

 

 Voter List – (The Karbhari News Service) – मतदार यादी शुद्धीकरणासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यासमवेत (बीएलओ) राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीने (बीएलए) गृहभेटी, मतदार नोंदणीच्या अनुषंगाने विशेष मोहीम, ऑनलाईन मतदार नोंदणीत मतदारांना सहाय्य करणे अपेक्षित असून त्यासाठी पक्षांनी बीएलएंची नेमणूक करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत श्रीमती कळसकर आणि निवडणूक शाखेचे तहसीलदार राहुल सारंग यांनी संवाद साधला.

श्रीमती कळसकर म्हणाल्या, मतदान केंद्र निश्चितीसाठी शक्यतो एका बूथमध्ये १ हजार ४५० मतदारांचा समावेश असेल अशी स्वयंचलीत प्रणाली उपयोगात आणली जात आहे. शहरात सध्या १५ पेक्षा अधिक बूथ असलेली ४० ते ४५ मतदान केंद्रे असून त्यांची सुसूत्रीकरण (रॅशनलायझेशन) करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच आपल्या घराजवळ असलेल्या मतदान केंद्राऐवजी लांब जावे लागलेल्या मतदारांना सोईचे होईल असे मतदान केंद्रांचे रॅशनलायझेशन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न असल्याचे श्रीमती कळसकर यांनी सांगितले.

मतदार नोंदणीचे काम निरंतर सुरू असते. तथापि, विशेष पुनरीक्षण मोहिमेत प्राप्त होणारे सर्व अर्ज विहित कालमर्यादेत निकाली काढून अंतिम मतदार यादी पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्याचे काम होत असते. त्यादृष्टीने आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे.

छायाचित्र यादीतील श्वेतधवल फोटो, अस्पष्ट फोटो असलेल्या मतदारांकडून रंगीत फोटो घेण्याची प्रक्रिया करण्यात येते. तसेच पत्ता बदल, स्थलांतरण तसेच दावे व हरकतींच्या अनुषंगाने संबंधित मतदारांना नोटीस देऊन कार्यवाही केली जाते. मतदारांनी शक्यतो आयोगाच्या https://voters.eci.gov.in या पोर्टलवरुन अथवा Voter Helpline वरुन मतदार नोंदणी, पत्ताबदल आदींचे अर्ज ६, अर्ज ७ तसेच ८ भरल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना त्यावर गतीने कार्यवाही करता येते. मतदार यादीतील नाव वगळणुकीची यादी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येते, असेही श्रीमती कळसकर म्हणाल्या.

यावेळी विशेष पुनरीक्षकण कार्यक्रम- २०२४ ची माहिती देण्यात आली. बैठकीत मतदार यादीतील नाव असणे- नसण्याच्या अनुषंगाने समस्या, तपशीलात बदल, मतदान केंद्रात, मतदान खोलीत बदल, अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.