Shrinath Bhimale PMC Standing Committee Chairman  | स्थायी समिती अध्यक्ष पदी श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड !

Homeadministrative

Shrinath Bhimale PMC Standing Committee Chairman  | स्थायी समिती अध्यक्ष पदी श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड !

Ganesh Kumar Mule Feb 23, 2026 6:59 PM

NCP-SCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात साजरा होणार | पुणे महानगरपालिकेवर पक्षाचा झेंडा फडकेल असा शहर अध्यक्षांचा विश्वास 
Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठक :  एकूण निर्णय-6 | जाणून घ्या सविस्तर 
Pune Property Tax | PT-3 application deadline is 30th November | Relief for Pune residents

Shrinath Bhimale PMC Standing Committee Chairman  | स्थायी समिती अध्यक्ष पदी श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड !

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड झालीआहे.  स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत फक्त भिमाले यांचा अर्ज वैध झाला. त्यामुळे ही निवड बिनविरोध झाली, असे पीठासीन अधिकारी यांनी घोषित केले.   (Pune Municipal Corporation – PMC)

प्रदेश भाजप कडून श्रीनाथ भिमाले यांचे नाव  निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी आपला अर्ज दाखल केला होता.

स्थायी समितीचा अध्यक्ष निवडण्या बाबत  विभागीय आयुक्त यांनी सोमवार २३ फेब्रुवारी ला सकाळी ११:३० वाजता निवणूक घेण्याची वेळ दिली. त्यानुसार निवडणूक पार पडली. स्थायी समितीच्या विशेष सभेत ही प्रक्रिया झाली. या निवडणूक प्रक्रियेसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके (Satishkumar Khadke IAS) हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते.

अध्यक्ष पदासाठी अर्ज स्वीकारण्याच्या दिवशी  एकूण २ अर्ज दाखल झाले होते. भाजपकडून श्रीनाथ भिमाले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून सुहास टिंगरे यांनी अर्ज दाखल केले होते. दरम्यान टिंगरे यांचा अर्ज १ वाजून १ मिनिटांनी दाखल झाला होता. असे असले तरी त्यांचा अर्ज स्वीकारला होता आणि ही परिस्थिती  पीठासीन अधिकारी यांच्यासमोर ठेवली होती. आज पीठासीन अधिकारी यांनी टिंगरे यांचा अर्ज अवैध ठरवला. भिमाले यांचा एकट्याचा अर्ज वैध झाला. त्यामुळे श्रीनाथ भिमाले हे स्थायी समिती अध्यक्ष पदी बिनविरोध निवडून आल्याचे पीठासीन अधिकारी यांनी घोषित केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: