Chandusheth Kadam Congress | ५०० चौ.फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींचा मिळकत कर माफ करण्यात यावा | चंदूशेठ कदम यांचा स्थायी समिती समोर प्रस्ताव

HomeBreaking News

Chandusheth Kadam Congress | ५०० चौ.फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींचा मिळकत कर माफ करण्यात यावा | चंदूशेठ कदम यांचा स्थायी समिती समोर प्रस्ताव

Ganesh Kumar Mule Feb 21, 2026 8:55 PM

Pramod Nana Bhangire | खराडीच्या धर्तीवर हडपसर परिसरातील विविध आगीच्या घटनांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत द्या | प्रमोद नाना भानगिरे यांची स्थायी समिती अध्यक्षांकडे मागणी 
PMC Sport Complex | PMC Swimming Tank | शहरातील 10 क्रीडा संकुलाची पुणे महापालिका करणार दुरुस्ती 
Pune PMC News | रोबोटिक यंत्रणेच्या माध्यमातून केले जाणार पाण्याच्या लाईन चे दुरुस्ती काम | पावणेतीन कोटी येणार खर्च 

Chandusheth Kadam Congress | ५०० चौ.फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींचा मिळकत कर माफ करण्यात यावा | चंदूशेठ कदम यांचा स्थायी समिती समोर प्रस्ताव

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – ५०० चौ. फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकती या गोरगरीब नागरिकांच्या असतात. ५०० चौ. फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकती या गोरगरीब नागरिकांच्या असतात. सध्याची महागाई व बेरोजगारी लक्षात घेता नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५०० चौ.फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींचा मिळकत कर माफ करण्यात यावा. कॉंग्रेस गटनेते चंदूशेठ कदम यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी स्थायी समितीत सादर केला आहे. (Pune PMC News)

 

कदम यांच्या प्रस्तावा नुसार  पुणे महानगरपालिका हद्दीतील निवासी मिळकत धारकांकडून मिळकत कर घेण्यात येतो. ५०० चौ. फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींचा मिळकत कर माफ करण्याबाबत नागरिकांकडून मागणी होत आहे. पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ पाहता भविष्यात निवासी, बिगर निवासी, मोबाईल टोवर अशा मिळकतीमधून करोडोंचा महसूल मनपास मिळणार आहे. तसेच पुणे शहरात कर आकारणी न केलेल्या हजारो मिळकती असून अशा मिळकतीना कर आकारणी करणे आवश्यक आहे. ५०० चौ. फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकती या गोरगरीब नागरिकांच्या असतात. सध्याची महागाई व बेरोजगारी लक्षात घेता नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५०० चौ.फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींचा मिळकत कर माफ करण्यात यावा. अशी मागणी कदम यांनी प्रस्तावाच्या माध्यमातून केली आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: