शहर महिला काँग्रेस तर्फे अनोखे आंदोलन
पुणे : पुणे शहर महिला काँग्रेस तर्फे मकर संक्रांत निमित्त भाजप सरकार उज्ज्वला गॅस योजना वान परत भेट करण्याचे आंदोलन आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे व पुणे शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्ष पूजा आनंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी उपस्थित होते.
संध्या सव्वालाखे म्हणाल्या, सर्व सामान्यांना न परवडणारे उज्ज्वला गॅस सिलेंडर मोदींना परत करणार. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणाऱ्या या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्व सामान्यांचे जगणे मुशकील केले आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढल्याने महिलांचे किचन बजेट कोडमडले आहे. उज्वला गॅसची सबसिडी कमी केल्याने गरीब महिलांना गॅस सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे,त्या मुळे महिला काँग्रेसच्या वतीने पूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे. उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर परत करून मोदी सत्कार चा निषेध करत आहोत. महागाई वाढवून केंद्र सरकारने महिलांच्या संक्रांतीच्या उत्साहावर विरजण टाकण्याचे काम केले आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. पंतप्रधान मोदींनी मोठा गाजावाजा करून महिलांना उज्ज्वला योजने मार्फत मोफत गॅस देण्याची घोषणा केली. मात्र आता गॅस सिलेंडरच्या किमती प्रचंड वाढल्याने महिलांना गॅस सिलेंडर घेणे परवडत नाही. उज्वला योजनेच्या बहुतांश लाभार्थ्यांनी आता गॅस सिलेंडर अडगळीत टाकले असून महिलांना परत जुन्या चुलीवर स्वयंपाक करावे लागणार आहे.
पुणे शहर महिला अध्यक्ष पूजा आनंद म्हणाल्या, दरवाढ केली मोदीने आणि आता त्याचा त्रास महिलांना संसार चालवण्यात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ज्या महिलांनी चुल सोडून गॅस चे कनेक्शन घेतले त्यांना पुन्हा मोदी सरकारच्या ना करते पणामुळे गॅसचे दर १००० रुपय च्या आसपास पोचले आहे. घर खर्च नाकेनऊ झाले आहे. मोदी सरकारने महिलांना चुलीवर जाण्यास भाग पाडले आहे, त्यामुळे महिलां मध्ये प्रचंड आक्रोश वाढले आहे, आता परत भाजपा ला कधी महिला मत देणार नाही.
या आंदोलनास संगीता तिवारी, उज्ज्वला साळवे, अस्मिता शिंदे, शोभा पनीकर, इंदिरा आहिरे, सुजाता चिन्ता, लताताई राजगुरू, सुजाता शेट्टी, स्वाती शिंदे, वैशाली मराठे, पल्लवी सुरसे, सीमा सावंत व अनेक महिला उपस्थित होते.
आंदोलनाचे आयोजन पुणे शहर महिला अध्यक्ष पूजा आनंद यांनी केले.
COMMENTS