Weight Loss : वजन कमी करायचे आहे ? मग नाश्त्याला हे पाच पदार्थ खाऊ नका!

Homeआरोग्यलाइफस्टाइल

Weight Loss : वजन कमी करायचे आहे ? मग नाश्त्याला हे पाच पदार्थ खाऊ नका!

Ganesh Kumar Mule Jan 17, 2022 3:40 AM

Navratri | Women Special | घरोघरी बायका वजन वाढीने वेगवेगळ्या दुखण्याने त्रस्त आहेत | त्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी? वाचा सविस्तर
Keto Diet | Weight Loss Tips | Keto Diet काय आहे? | वजन कमी करण्यासाठी हा उपयुक्त आहे का? | याविषयीची शास्त्रीय माहिती जाणून घ्या
Protein Sources | वजन वाढू न देण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी प्रोटीन च का आवश्यक असतात? आपल्या आहारात तुम्हाला कशातून प्रोटीन मिळेल? स्रोत जाणून घ्या!

Weight Loss : वजन कमी करायचे आहे ? मग नाश्त्याला हे पाच पदार्थ खाऊ नका

वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी लोकं खूप प्रयत्न करत असतात. कोणी खूप चालतं. जीमला जाऊन व्यायाम करतं पण काही केल्या वजन कमी होत नाही. मग आहार (Food) कमी करण्यावर अनेक लोकं लक्ष देतात. त्यासाठी खूप पदार्थ खाणे टाळले जाते. अशावेळी नेमकं काय खावं काय खाऊ नये ते समजत नाही. अशावेळी अनेकांकडून कर्बोदके अर्थात कार्बचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. काहीजण तर पार विचित्रपणा करतात.  वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात. असे केल्याने शरीराला (Body) अपाय जास्त होतो. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. पण काही प्रकार नाश्त्याला तुम्ही अजिबात खाऊ नयेत. ते खाल्ल्याने नक्कीच वजन वाढू शकते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळावे. ( Foods To Avoid For Weight Loss)

हे पदार्थ खाणे टाळाच (Do Not Consume These Foods)

१) ज्यूस कॅन – फळांच्या ज्यूसचे कॅन किंवा पॅक केलेल्या फळांच्या रसात भरपूर साखर असते. त्यामुळे नाश्त्यासाठी हा अत्यंत वाईट पर्याय आहे. या ज्यूसमध्ये प्रथिने आणि फायबर जेमतेम असते. त्यामुळे दुपारच्या जेवणाआधीच तुम्हाला खूप भूक लागते. शिवाय यात कॅलरीज भरपूर असतात.

२) बेकन किंवा सॉसेजेस -जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर प्रोसेस्ट केलेले फॅटी बेकन आणि सॉसेज सारखे प्रक्रिया केलेले मांस खाणे अजिबातच चांगले नाही. शिजवलेले सोयाबीन तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सॉसमध्ये साखर असते. त्यामुळे हे प्रक्रिया केलेले अन्न खाऊन तुमचे वजन वाढते. त्यामुळे नाश्त्याला हा प्रकार वर्ज्य करणे चांगले.

३) कुकीज आणि केक– मैदा किंवा प्रक्रिया केलेल्या पीठापासून काही कुकीज आणि केक तयार केला जातो. ज्यात कार्बोहायड्रेट ची गुणवत्ता अतिशय खराब असते. त्यात पोषणतत्व कमी प्रमाणात असतात. जास्त साखर असल्याने वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ टाळणे बरे.

4) पांढरा ब्रेड – पांढरा ब्रेड प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून बनलेला असतो. त्यात कार्बोहायड्रेट्स असतात जे पटकन पचतात. त्यामुळे रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ होऊन चयापचय प्रक्रियेस अडथळा येऊ शकतो. तसेच तुम्हाला लवकर भूक लागते. त्यामुळे. पांढरा ब्रेड खाण्यापेक्षा संपूर्ण धान्य किंवा मल्टी ग्रेन ब्रेड खाणे चांगले.

५) फ्लेवर्ड योगर्ट-चांगल्या दर्जाचे घरचे दही हे कॅल्शियम, प्रोटीन आणि प्रोबायोटिक्सने युक्त असते. हे दही तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले असते. पण जेव्हा कृत्रिम चव आणि गोड पदार्थ एकत्र केले जातात तेव्हा त्याचा फायदा होण्यापेक्षा तोटा अधिक होतो. फ्लेवर्ड योगर्टमध्ये जास्त साखर असतेय त्यामुळे अधिक कॅलरी साठतात. त्यामुळे पॅक केलेले फ्लेवर्ड दही निवडण्याऐवजी साधे दही वापरा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0