Tushar Patil BJP | काशेवाडी भवानी पेठ मधील नवीन एस आर ए प्रकल्प पुणे महापालिकेने राबवावा | तुषार पाटील यांची मागणी

Homeadministrative

Tushar Patil BJP | काशेवाडी भवानी पेठ मधील नवीन एस आर ए प्रकल्प पुणे महापालिकेने राबवावा | तुषार पाटील यांची मागणी

Ganesh Kumar Mule Mar 19, 2025 7:56 PM

Bhima Koregaon | भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम – डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सामाजिक संस्थांचा सहभाग – सलग आठ वर्ष उपक्रम
Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची सायकल वारी
Vishwa Marathi Sammelan 2025 | विश्व मराठी संमेलनाची उद्या सांगता होणार | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती!

Tushar Patil BJP | काशेवाडी भवानी पेठ मधील नवीन एस आर ए प्रकल्प पुणे महापालिकेने राबवावा | तुषार पाटील यांची मागणी

 

SRA Project Kashewadi – (The Karbhari News Service) – काशेवाडी भवानी पेठ मधील नवीन एस आर ए प्रकल्प हा पुणे महापालिकेने राबवावा. अशी मागणी भाजप शहर उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच नागरिकांची फसवणूक करून त्यांचे खोटे नाटे कागदपत्रे बनवून संमती घेण्याचे प्रकार सुरू आहेत. असा आरोप पाटील यांनी केला आहे. (Pune News)

पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, काशेवाडी भागामध्ये नवीन एस आर ए प्रकल्प करण्याचे काही स्थानिक आणि विशिष्ट राजकीय पुढारी यांनी झोनिपू च्या लेखी सूचना किंवा परवानगी नसताना देखील करण्याचा घाट घालत आहेत. नागरिकांची फसवणूक करून त्यांचे खोटे नाटे कागदपत्रे बनवून संमती घेण्याचे प्रकार तसेच खासगी लोकांकडून नागरिकांच्या घराचे मोजमाप घेण्याचे बेकायदेशीर काम त्यांना धमकी देवून सर्रासपणे सुरू आहे. तसेच काही विशिष्ट पक्षाच्या पुढाऱ्यांकडून बॅनर लावून लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे. असे पाटील यांनी म्हटले आहे.

पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, एकीकडे झोनिपू ची कोणतीही परवानगी नसताना देखील सदरचे प्रकार सुरू आहे. तसेच महापालिका प्रशासनाकडून झोनिपू च्या पत्रावर उत्तर देताना लेखी स्वरूपात असे काळविण्यात आले आहे की काशेवाडी मध्ये बहुतांश नागरिकांकडे त्यांच्या घरांची कागदपत्रे नसल्याचे कळविले आहे. अश्या दाट लोकवस्ती मध्ये अनेक घरांची कागदपत्रे नसून देखील सदर राजकीय पुढारी स्वतच्या स्वार्थासाठी बनावट कागदपत्रे करून संमती घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी स्थानिक आमदार  यांनी देखील पत्र दिलेले असून एस आर ए प्रकल्प हे पुणे मनपा मार्फत राबविण्यात यावे. अशी मागणी केली आहे. तरी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून आणि कोणताही चुकीचा पायंडा पडू नये म्हणून या प्रकरणी आमदार यांच्या सोबत विचार विनिमय करून बैठक बोलावून पुढील योग्य ती कार्यवाही करावी. तसेच त्या प्रकारचे लेखी आदेश काढण्यात यावे. असे पत्रात नमूद केले आहे.