PMC Labour Welfare Department | कामगार कल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा 

HomeBreaking News

PMC Labour Welfare Department | कामगार कल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा 

Ganesh Kumar Mule Mar 17, 2026 9:40 PM

PMC Sanitation Workers |  जागतिक महिला दिन” निमित्त महिला सफाई कामगारांचा विशेष सन्मान!
International Women’s Day : PMP Free Bus : महिला दिनानिमित्त महिलांना पीएमपीचा  मोफत प्रवास करता येणार नाही? 
Maharashtra Women Policy | राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिनाची भेट

PMC Labour Welfare Department | कामगार कल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

 

International Womens Day – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका कामगार कल्याण विभागाच्या वतीने  जागतिक महिला दिन आज साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून स्वरदा बापट, विधी समिती अध्यक्षा, स्मिता वस्ते, अध्यक्षा, शहर सुधारणा समिती या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी यांनी केले.  केंजळे यांनी महिला दिनाचा इतिहास सांगून हा दिवस महिलांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आहे असे नमूद केले. तदनंतर मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता (विद्युत) व सुरेखा भणगे, महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. (Pune PMC News)

स्वरदा बापट यांनी महिला दिन हा महिलांच्या कतृत्वाला सलाम करण्याचा दिवस आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये पुरुष नगरसेवकांपेक्षा महिला नगरसेविकांची संख्या जास्त आहे. यावरून सध्याची महिला ही कर्तृत्ववान असून देशातील प्रगतीमध्ये त्यांचा वाटा मोठा आहे असे नमूद करून त्यांनी स्फूर्तिदायी कवितेच्या चार ओळी गाऊन सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व कोणत्याही महिलेचे कोणतेही काम असल्यास त्यांनी अवश्य आम्हांला भेटावे आम्ही त्यांना मदत करू असे नमूद केले.

स्मिता वस्ते यांनी सर्व महिला कर्मचारी या त्यांचे घर सांभाळून काम करतात. महिलेने एक दिवस घरात काम केले नाही तर त्याची जाणीव पुरुषांना होते. कारण महिला ह्या फक्त स्वतःचा विचार करत नाही तर पूर्ण कुटुंबाचा विचार करणारा आधारस्तंभ आहे. महिला ह्या ऑफिसमध्ये काम करताना त्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. त्यांना कामामध्ये खुप स्ट्रेस असतो त्यांच्यासाठी महिला दिनानिमित्त या ठिकाणी मा.बंडा जोशी यांचे व्याख्यान आयोजित केल्याने महिलांनी त्याचा खूप आनंद घेतला. महिला खुप खळखळून हसल्या. त्यामुळे त्यांचा ताण कमी झाला. याबाबत त्यांनी कामगार कल्याण विभागाचे आभार मानले व सर्व महिलांची आरोग्य तपासणी घ्यावी अशी सूचना करून सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

तदनंतर सर्व महिला अधिकाऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर बंडा जोशी, जेष्ठ हास्य कवी, हास्य कलाकार यांचा हास्यपंचमी हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचा महिलांनी मनमुराद आनंद लुटला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पूजा देशमुख व आयोजन सागर मैड व कामगार कल्याण विभागातील कर्मचारी यांनी केले.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0