महत्वाकांक्षा असावी पण आवाक्यातली!
पुण्याचे महापौरांचे संजय राऊत यांना उत्तर
पुणे: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकताच दावा पुण्याचा पुढचा महापौर हा शिवसेनेचा असेल. त्यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संजय राऊत यांना ट्विटर च्या माध्यमातून उत्तर दिले आहे. महापौर म्हणतात, पुण्यात तुमचे एकूण नगरसेवक १० आणि दावा महापौरपदाचा! महत्त्वाकांक्षा असावी, पण किमान आवाक्यातली तरी !
: नेमके काय म्हणाले महापौर?
अहो @rautsanjay61 जी,
पुण्यात तुमचे एकूण नगरसेवक १० आणि दावा महापौरपदाचा! महत्त्वाकांक्षा असावी, पण किमान आवाक्यातली तरी !
महापौरपदासाठी १० चे ८५ नगरसेवक करावे लागतील, याची माहिती आधी घ्या आणि मगच दावे करा !
तरीही आपल्याला शुभेच्छा !
COMMENTS