PMC Bhavan Security | पुणे महापालिकेत सुरक्षा कडक | ओळखपत्र परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश | फुलांचे गुच्छ निषिद्ध

Homeadministrative

PMC Bhavan Security | पुणे महापालिकेत सुरक्षा कडक | ओळखपत्र परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश | फुलांचे गुच्छ निषिद्ध

Ganesh Kumar Mule Jun 10, 2026 8:23 PM

Pune PMC News | महापालिकेचे आरोग्य निरिक्षक, मोकादम यांच्यावर दंडात्मक कारवाई | कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Katraj Kondhwa Road | कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती : उच्चस्तरीय समितीच्या बैठकी मध्ये अंतिम निवाडा प्रस्तावास मान्यता, पहिला टप्प्याचा ५० मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा मार्ग मोकळा
Naval Kishore Ram IAS | जनगणना कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही | अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर निलंबन व फौजदारी कारवाईचे आयुक्तांचे आदेश

PMC Bhavan Security | पुणे महापालिकेत सुरक्षा कडक | ओळखपत्र परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश | फुलांचे गुच्छ निषिद्ध

 | बॉम्ब ईमेलनंतर इमारत खाली करून तपास करण्यात आला

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय आणि महापौर कार्यालयाला बॉम्ब ब्लास्टबाबतचा धमकीचा ईमेल प्राप्त झाल्यानंतर महापालिकेत सुरक्षा व्यवस्था तातडीने कडक करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार उद्यापासून केवळ ओळखपत्र परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिका सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या मुख्य कार्यालय आणि  महापौर कार्यालयाच्या ईमेलवर बॉम्ब ब्लास्टचा थेट ईमेल प्राप्त झाला होता. याची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्त   नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार तातडीने संपूर्ण मुख्य इमारत खाली करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी दाखल होऊन शोधकार्य सुरू केले. शोधकार्य पूर्ण झाल्यानंतरच मुख्य इमारतीतील कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. तोपर्यंत पुणे महानगरपालिका आवारात सर्वांसाठी प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता.

नवे सुरक्षा नियम

सुरक्षा वाढवण्यासाठी पुढील आदेश लागू करण्यात आले आहेत:

ओळखपत्र अनिवार्य: उद्यापासून केवळ ओळखपत्र परिधान केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांनाच प्रवेश मिळणार आहे.

बॅग तपासणी: महापालिका भवनात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बॅगची तपासणी केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.

फुलांचे गुच्छ निषिद्ध: कोणत्याही प्रकारचे फुलांचे गुच्छ आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या आदेशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून अहवाल महापालिकेला सादर केला जाणार आहे, अशी माहिती राकेश विटकर यांनी दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: