Private Travels : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा असा ही परिणाम!

HomeBreaking Newsपुणे

Private Travels : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा असा ही परिणाम!

Ganesh Kumar Mule Nov 07, 2021 3:19 PM

Stall on ST Bus Stand | आता प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल
MSRTC | (Liquefied Natural Gas (LNG)| राज्यातील ५००० एस टी बसेस डिझेल ऐवजी एलएनजीवर धावणार | महामंडळाची २३४ कोटी रुपयांची बचत होणार
DA Hike | MSRTC Employees | एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा उलटा परिणाम

: खासगी कॅब, ट्रॅव्हल्सने सर्वसामान्य प्रवाशंची लूट सुरू केली

पुणे : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा. या तसेच इतर अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. एसटी कामगार संघटना आणि राज्य सरकार यांच्यात बोलणी सुरू आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक फटका पुणे, मंबईतून दिवाळीनिमित्त गावाकडे गेलेला नागरिकांना बसत आहे. सोमवार (दि.८) पासून पुन्हा ते मुंबई-पुण्याकडे परतू लागले आहेत. मात्र, खासगी कॅब, ट्रॅव्हल्सने सर्वसामान्य प्रवाशंची लूट सुरू केली आहे.

एसटी गाड्यांचे मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद उस्मानाबाद, बीड, लातूरसाठी साधरण २०० ते ५०० रूपयांच्या दरमान्य भाडे आहे. मात्र, संपामुळे प्रवाशांना आपआपल्या गावावरून पुणे, मुंबईकडे येण्यासाठी अक्षरश: लूट सुरू झाली आहे. खासगी ट्रॅव्हल्स, कॅब वाल्यांनी याचा गैरफायदा घेत गाडीभाड्यात तिप्पट-चौपट दर केले आहे.

खासगी ट्रॅव्हल्सचे वाढीव दर

शिवाजीनगर ते अमरावती १५०० रूपये

पुणे  ते उस्मानाबाद ११०० रूपये

पुणे  ते लातूर १२०० रूपये

पुणे ते बीड १००० रूपये

पुणे  ते वर्धा १२०० रूपये

पुणे ते नाशिक ५०० ते ६०० रूपये

पुणे ते नागपूर १५०० ते १८०० रूपये

पुणे ते औरंगाबाद ७०० रूपये

पुणे ते मुंबई ६०० ते ७००

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar

    राज्य सरकारने व परिवहन मंत्री यांनी लवकर शुद्धीवरती येऊन एसटी कामगारांचा संप सामोपचाराने तत्काळ मिटवून त्यांना त्यांच्या हक्काचे मागण्या मान्य करा…. शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना एसटी कंडक्टर, ड्रायव्हर चे पाठीशी, मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना व अर्थमंत्री अजितदादा पवार, परिवाहन मंत्र्यांना, प्रधान सचिव यांना भेटीसाठी वेळ मागितला, विठ्ठल पवार राजे प्रदेशाध्यक्ष शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांची सरकार कडे मागणी.

    महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळात काम करणारी मुलं ही कुणा बजाज, अंबानी, अदाणी , कल्याणी, यांच्या कुळातले नसून ती शेतकरी कोड आणि खानदानी तरी आहेत म्हणूनच ते एवढा मोठी जोखीम उचलून एसटी सारख्या बचत चालू त्यामध्ये वाहक व ड्रायव्हरचे काम करतात म्हणून शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार राजे व सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांचा या आंदोलनाला पाठिंबा जाहीर आहे सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून संप मिटवावा व एसटी कामगार ड्रायव्हर यांच्या मागण्या मान्य कराव्यात, विठ्ठल पवार राजे प्रदेश अध्यक्ष. यांची मागणी.
    महाराष्ट्र सरकार व राज्यातील जनतेसाठी एसटी चा सतत संप ही अत्यंत दुर्दैवी घटना असे म्हणता येईल आज पर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या पण आता एसटी कामगारांच्या जवळपास अठरा-एकोणीस आत्महत्या झाल्या ही गोष्ट सरकारला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री सहकार मंत्री किंवा गृहमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत राज्याचे मुख्य सचिव प्रधान सचिव व सचिव हे लोकांना हे सर्वसामान्यांच्या होताना दिसत नाही आहे का आज एवढ्या मोठ्या तक्रारी सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये कुठे धाडी पडत आहेत, कुठे येते कुठे लागलेली आहे कुठे काय काय चाललय कुठे आहे कुठे आणि तो काय त्याचं नाव नवाब मलिक त्यांच्या फालतु कामाकडे सरकार ला पूर्ण लक्ष द्यायला वेळ आहे.? पण यांना शेतकरी कष्टकरी कामगार प्रवाशांकडे, त्यांचे मुलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि यांना मात्र गावी जाऊन या लोकांना दिवाळी करता येते नैते लोक मौजा मजा करतायेत सरकारी लोकांना आज ना उद्या याची किंमत मोजावी लागेल. तत्पूर्वी सरकारला एक सूचना आहे आणि त्यातली त्यात परिवाहन मंत्र्यांना बाबांनो तुम्ही त्या एसटी, कंडक्टर ड्रायव्हर यांना पगार दिलाच पाहिजे ते अत्यंत जोखमीचे काम करत आहेत त्यांचा पगार किमान ४९ हजारचे वरचा किंवा ५९ हजारचे खालचा असला पाहिजे म्हणजे अंदाजे चाळीस ते पन्नास हजार रुपये त्यांना पगार दिलाच पाहिजे, तुम्ही एकदा चा पगार देऊन टाका त्यांना आणि त्यांची मागची थकीत देणी पण उद्या, कुठे जाणार कुठले त्यांना दुसरा कोणता आधार आहे. दोन नंबरचे धंदे वाले नाही ते, त्यांना एक रुपयाचा कमी पडला तर पदरचा भरावा लागतो.
    आणि ते सरकार मधले मलिदा गोळा करणारे म्हसुल वाले यांना जरा लाज वाटली पाहिजे ना, एसटी बस वाले 50/ 100 लोकांचा जीव घेऊन जातायेत त्याना सन्मानाने त्यांना पोचवतात घरापर्यंत. प्रवाशांच्या जीवाची काळजी घेतात सरकारने एसटी ड्रायव्हर कंडक्टर ची काळजी घेतली चे पाहिजे आणि ती घ्यायलाच पाहिजे, अता या परिस्थितीमध्ये हा संप मोडून काढायचा नाही किंवा मोडायचा प्रयत्न करू नये तर हा संप त्यांच्या मागण्या रास्त आहेत त्यांचे थकीत पगार द्या थकीत वेतन द्या त्यांच्या पगारामध्ये वाढ करा दिवाळीचा बोनस पण द्या त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नका.
    राजकारणी संप करायला लावतात आणि खाजगी वाहनांचे खाजगी बस चालक खाजगी गाड्या वाल्यांच्या तुंबड्या भरायच्या तिकडं पोलिसांमार्फत सरकारच्या दलालांना पैसे भेटतात हे बंद करा जनता जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत उगाच सरकारने ऊलटे सुलटे वागू नये. तुम्हाला 2014 ला धडा मिळालेला आहे आणि तसाच धडा घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचं ठरवा आमचं हे सांगण्याचे कर्तव्य आम्ही सांगितलेला आहे.
    शरद जोशी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, शेतकरी कष्टकरी कामगार सहकार बचाव आंदोलन, सफाई कामगार युनियन या सर्वांच्या वतीने मी विठ्ठल पवार राजे सरकारला विनंती करतो की एसटी कामगारांना त्यांच्या मागण्या मान्य करा त्यांच्या आत्महत्या होऊ देऊ नका आत्महत्या हा देशाचे भूषण नाही राज्याचा भूषण नाही. आणि सरकारचं तर अजिबात नसावा मी हा संप तत्काळ सुटावा, त्यांचे प्रश्न सोडवून पूर्ववत सुरू प्रवाशी वाहतूक करायला सांगा आणि खाजगी गाड्या आणि वाहतूक दलाली बंद करा तर सरकारलाही त्याच्यामध्ये मोठा फायदा होईल एसटी महामंडळ पुन्हा पूर्ववत फायद्यात येईल.
    जय किसान.
    धन्यवाद .
    विठ्ठल पवार राजे .
    प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक .
    शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

DISQUS: 0