MSRTC Employees | एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे | सुनील शिंदे
ST Employees Salary – (The Karbhari News Servie) – सरकारने बजेटरी प्रोव्हिजन करून एसटी कर्मचाऱ्यांची वेतन वेळेवर करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अशी मागणी कामगार नेते सुनील शिंदे यांनी केली आहे. (Maharashtra News)
एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात जवळपास निम्म्या पगारात कपात केली आहे. यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. मात्र यामुळे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. याबाबत कामगार नेते सुनील शिंदे यांनी सांगितले कि, सरकारकडून नागरिकांना, महिलांना मोफत प्रवासाच्या वेगवेगळ्या योजना सवंग प्रसिद्धीसाठी जाहीर केल्या जातात. स्पेअर पार्ट च्या वाढत जाणाऱ्या किमती, वाढणाऱ्या डिझेलच्या किमती या कशावरही नियंत्रण नाही. मात्र सरकार तिकीट दर वाढीवर बंदी घालते. अशा परिस्थितीमध्ये एसटी फायद्यात येणार कशी? आणि दुसरीकडे एसटी तोट्यात चालते म्हणून कामगारांना पगार नाही, ही सरकारची भूमिका आहे, ती योग्य नाही. सरकारने बजेटरी प्रोव्हिजन करून कर्मचाऱ्यांची वेतन वेळेवर करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. नाही तर तिकीट दर वाढ व इतर बंधने घालण्याचा सरकारला कोणताही नैतिक अधिकार नाही. असे शिंदे यांनी म्हटले आहे.
COMMENTS