पुण्यातील गोखलेनगर भागातील नागरिकांनी मोदींना लिहिली पत्रे
: व्यक्त केले आभार
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी जाहीर केलेल्या योजनांची गोखलेनगर भागातील नागरिकांना घरोघरी जाऊन माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आली. याबद्दल नागरिकांच्या भावना व्यक्त करणारी आभाराची पत्रे खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पत्रपेटीत टाकण्यात आली.
यावेळी जावडेकर म्हणाले, या उपक्रमाद्वारे कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये जाऊन लसीकरण, मोफत अन्नधान्य वितरण आणि महिलांच्या नावाने जनधनच्या खात्यात पंधराशे रुपये दिल्याबद्दल महिलांनी मोदींच्या नावे पत्रे दिली होती. मोदी सरकारने केलेले काम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेला हा उपक्रम चांगला आहे.
शहर भाजपचे उपाध्यक्ष योगेश बाचल यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी सतीश बहिरट, लक्ष्मण नलावडे, प्रभाकर पवार, किरण ओरसे, रोहीत लिंबाळे, रामु धनगर, रमेश भंडारी, सर्जेराव धोत्रे, स्नेहल ढावरे, युवराज गाटे, रवी जाधव, ईश्वर बनपट्टे, शैलेश चलवादी उपस्थित होते.
नागरिकांनी जन औषधी योजनेचा लाभ घ्यावा : जावडेकर
गोखलेनगर भागात विवेक किरवे यांनी जनौषधी केंद्र सुरू केले आहे. अशा केंद्रांचा प्रचार केला पाहिजे. शंभर रुपयांतील औषधे वीस रुपयाला मिळतात. डॉक्टर ब्रेंडेड औषधे लिहून देतात त्यापेक्षा मूळ औषधे दिली पाहिजेत. ती स्वस्त आहेत. जनौषधी केंद्र म्हणजे मोदींचे स्वस्त औषधांचे दुकान आहे. देशभर आठ हजारहून अधिक आहेत. चार लाख नागरिक याचा लाभ घेतात. लोकांचा खर्च आवाकात आला आणि त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी जन औषधी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जावडेकर यांनी केले
COMMENTS