The Karbhari News Impact | घनकचरा आणि आरोग्य विभागातील १७२ कर्मचाऱ्यांना मोकादम पदावर पदोन्नती!

Homeadministrative

The Karbhari News Impact | घनकचरा आणि आरोग्य विभागातील १७२ कर्मचाऱ्यांना मोकादम पदावर पदोन्नती!

Ganesh Kumar Mule May 11, 2026 6:10 PM

Dr Siddharth Dhende | सामाजिक बांधिलकीतून उजळली दिवाळी – सावली संस्थेतर्फे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते 250 बेघर आणि गरजूंना साड्या व फराळ वाटप
Ganesh Bidkar on Hoarding Policy | वादाच्या भोवऱ्यात सापडलेले होर्डिंग धोरण न करण्याचा निर्णय | सभागृह नेते गणेश बिडकर यांची घोषणा 
PMRDA Pune | पीएमआरडीएतील 10 सेवा नागर‍िकांसाठी ऑनलाईन

The Karbhari News Impact | घनकचरा आणि आरोग्य विभागातील १७२ कर्मचाऱ्यांना मोकादम पदावर पदोन्नती!

: महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश जारी

 

PMC Emplyoees Promotion – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या घनकचरा (PMC Solid Waste Management Dept) आणि आरोग्य विभागातील (PMC Health Dept) चतुर्थ श्रेणी वर्गातील १७२ कर्मचाऱ्यांना मोकादम (PMC Mokadam) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. शिवाय त्यांच्या नेमणुका देखील करण्यात आल्या आहेत. या बाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर (Prajit Nair IAS)  यांनी जारी केले आहेत. दरम्यान बऱ्याच दिवसांपासून ही रखडलेली प्रक्रिया पूर्ण झाल्याने कर्मचारी वर्ग समाधानी झाला आहे. याबाबत “The कारभारी” वृत्तसंस्थेने बातमी प्रसारित केली होती. त्याची दखल घेण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

आमची ही देखील बातमी वाचा : PMC Employees Promotion | विशिष्ट कर्मचाऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन मोकादम पदाच्या पदोन्नतीसाठी अर्ज करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ!

 

पुणे महापालिकेच्या आरोग्य आणि घनकचरा विभागातील मोकादम पदाच्या (वर्ग ४) रिक्त जागा पदोन्नती ने भरण्यात येणार होत्या. त्यासाठी महापालिका प्रशासना कडून सफाई कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. सुरुवातीला यासाठी अर्ज करण्यासाठी २ जुलै २०२५ ते पुढील १५ दिवस कालावधी देण्यात आला होता. मात्र या कालावधीत पर्याप्त अर्ज प्राप्त  न झाल्याने २३ जुलै ते १ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर यावर हरकती आणि सूचना घेऊन अंतिम सेवाज्येष्ठता यादी २७ फेब्रुवारी २०२६ ला प्रसिद्ध करण्यात आली.

नवीन गावांचा समावेश झाल्यानंतर महापालिकेचे क्षेत्रफळ पाचशे कि.मी.च्या पुढे गेले आहे. शहराच्या भौगोलिक परिस्थितीच्या तुलनेत कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. अशातच शहर स्वच्छतेसारख्या जनतेच्या दैनंदीन गरजेसाठीच्या घनकचरा विभागातील कोठी कार्यालयांमध्ये काम करणार्‍या मुकादमांची पदेही मोठ्या प्रमाणावर रिक्त होती. तसेच आगामी काळात स्वच्छ सर्वेचे देखील काम असणार आहे. त्यासाठी ही पदे भरणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रक्रिया करण्यात आली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: