Swimmer Sampanna Shelar | पुण्याचा जलतरणपटू संपन्न शेलार याचा अरबी सुमद्रात अनोखा विक्रम!
| सव्वा चार तासांत सुमारे 28.5 किमी अंतर पोहून केले पार
Swimmer Sampanna Shelar – (The Karbhari News Service) – पुण्याचा जलतरणपटू संपन्न रमेश शेलार याने अरबी समुद्रात (Arabian Sea) पोहण्याचा अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. गव्हर्नर्स बंगला (Governors Bunglow) ते अटल सेतू (Atal Setu) हे सुमारे 28.5 किमी अंतर त्याने 4:15 तासांत यशस्वीरीत्या पोहून पार केले. एका प्रक्रियेत हे अंतर कापणारा तो पहिला आणि एकमेव जलतरणपटू बनला आहे.
संपन्न हा पुणे महापालिकेचे अधिकारी डॉ. रमेश शेलार (Dr Ramesh Shelar PMC) यांचा मुलगा आहे. संपन्नची आई शारदा शेलार यांनी त्याला सर्वतोपरी पाठिंबा दिला आणि त्याने हा विक्रम करून दाखवला आहे.
संपन्न चे जलतरण मधील प्रशिक्षक शेखर खासनीस (Coach Shekhar Khasnis) आणि संपन्न ने हा धाडसी आणि अनोखा प्रयोग करण्याचे ठरवले होते. कारण याआधी असा विक्रम कुणीही प्रस्थापित केला नव्हता. एवढे अंतर एवढ्या वेळात पार करणार तो एकमेव जलतरणपटू बनला आहे. संपन्न च्या या कामगिरीने त्याने परिवारा सोबतच पुणे आणि राज्याची मान देखील उंचावली आहे.