PMC All Party Leaders Committee | पक्षनेते सभा अस्तित्वात येणार | सदस्यांची केली जाणार नियुक्ती 

Homeadministrative

PMC All Party Leaders Committee | पक्षनेते सभा अस्तित्वात येणार | सदस्यांची केली जाणार नियुक्ती 

Ganesh Kumar Mule Mar 13, 2026 11:30 AM

PMC E Toilets | ई टाॅयलेट्स साध्या टाॅयलेट्स मध्ये रुपांतरीत करुन नागरीकांना साधी पण स्वच्छ सार्वजनिक टाॅयलेट्स ची सेवा उपलब्ध करून द्या | विवेक वेलणकर यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 
Pune Property Tax | सर्व पुणेकर मिळकतधारकांना ४०% करसवलत देण्याची आमदार हेमंत रासने यांची मागणी
CM Devendra Fadnavis on PMC Cancer Hospital | सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

PMC All Party Leaders Committee | पक्षनेते सभा अस्तित्वात येणार | सदस्यांची केली जाणार नियुक्ती

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – मनपाची निरनिराळी अधिकार क्षेत्रे, सभासद, अधिकारी यांच्यात समन्वय राखून महत्वाची धोरणे विचार विमर्श करून ठरविता येणे जरूर आहे. यादृष्टीने एक पक्षनेते सभा ( समन्वय समिती ) नेमणे आवश्यक आहे. त्यानुसार आता पक्षनेते सभा अस्तित्वात येणार आहे. यासाठी सदस्यांची नियुक्ती केली जाणर आहे. याबाबतचा प्रस्ताव  मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला आहे. (PMC General Body Meeting)

मनपाची निरनिराळी अधिकार क्षेत्रे, सभासद, अधिकारी यांच्यात समन्वय राखून महत्वाच्या धोरणांचा विचार विमर्श करून निर्णय घेणे, महत्वाच्या योजना कोणत्या पध्दतीने व प्राधान्याने घ्यावयाच्या त्यासाठी मनपा वर किती आर्थिक बोजा घ्यावयाचा वगैरेबाबत निर्णय घेणे, हा पक्षनेते सभा गठीत करण्याचा उद्देश आहे. त्यानुसार सभा गठीत करण्यात येईल तसेच सभासद देखील ठरवले जातील.

पक्षनेते सभेतील ( समन्वय समितीतील ) सभासद :-

अ) पदसिध्द सभासदः-

१) महापौर
४) सभागृह नेता
२)  उपमहापौर
५) विरोधी पक्षनेते
३) अध्यक्ष, स्थायी समिती
६) लगतचे एक माजी महापौर

आ)
१)  गटनेते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३)  गटनेते, शिवसेना (उबाठा गट)
२) गटनेते, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शप गट)

कार्यक्षेत्र असे असेल :-

१) महानगरपालिकेच्या निरनिराळ्या समित्या व अधिकार क्षेत्रात शक्यतो मतभेद होऊ न देता कार्यात सुसूत्रता व समन्वये राखणे,
२) महानगरपालिकेच्या कामासंबंधी वेळोवेळी निर्माण होणाऱ्या महत्वाच्या विषयांवर सर्व संम्मत धोरण ठरविणे.
३) मुख्य सभेची मान्यता मिळण्यापूर्वी महानगरपालिकेतर्फे काही महत्वाचे निर्णय तातडीने घेण्याचे प्रसंग आले तर त्यासंबंधी धोरण ठरविणे.
४) चालु अंदाजपत्रकातील व पंचवार्षिक योजनेतील कामाच्या प्रगतीचा आढावा घेणे.

पक्षनेते सभेत ( समन्वय समिती ) धोरण ठरले असले तरी प्रत्येक प्रकरणांवर प्रचलित नियमान्वये आवश्यक असणारी मान्यता योग्य त्या समितीकडून अगर त्यांच्या तर्फे स्थायी समितीची महानगरपालिकेची मान्यता घेण्यात येणार आहे. इतर समित्यांप्रमाणे याही समितीचे काम चालणार असल्याने समितीत चर्चेस घेण्याचे विषय महापौर यांनी महापालिका आयुक्त यांचा सल्ला घेवून ठरवले जातील.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: